Skip to main content

एक तरी शिवी आठवावी

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 01/06/2018 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी शिवी आठवावी "एक तरी ओवी आठवावी" असे कुणीसे म्हटले आहे त्याच चालीवर " एक तरी शिवी आठवावी" असेही कुणीतरी (म्हणजे मीच) म्हटले आहे. मी आणि मला दिलेल्या शिव्या हा स्वतंत्र लिखाणाचा भाग होऊ शकेल असे मला कधी वाटले न्हवते पण झाला आहे खरा. मी अगदीच लहान असताना हा चोर आहे किंवा लबाड आहे अस मला म्हटले गेले असेलच किमान तशी शंका घ्यायला वाव आहे, कारण मला थोडस समाजायला लागल्यावर " लबाड अगदी आईवर गेलाय" हे मी ऐकत होतो ( आइवर गेलाय म्हणजे अगदी आईच्या जीवावर गेलाय अगदी आईच्या जीवावर उठलाय, आईचा जीव घेऊनच शांत झालाय असा काही अर्थ नीघेल अस मला तेंव्हा अजीबात वाटल न्हवत. पण तस झाल मात्र खर) पुढे शाळेत जायला लागल्यावर खुप दिवस " तू म्हणजे अगदी दगड आहेस" है ऐकत राहीलो. " त्याचा सोयीस्कर अर्थ तू म्हणजे अगदी दगड़ा सारखा अविचल आहेस. राग लोभ द्वेष तमा या दुर्गुणा पासून दूर आहेस असा घेत राहीलो. पुढे थोडा मोठा झाल्यावर बाबा कधी पाठीवर धपाटा देताना "घोड़ा" असे अर्ध्य सोडत. मी ही ते " इदम न मम" म्हणून मनाला लावून घेत नसे. कधी कधी धपाटा पाठीच्या डाव्या तर कधी पाठीच्या उजव्या बाजूवर बसत असे. मी ही त्या त्या प्रमाणे पाठच्या जानव्याचे कधी सव्य तर कधी अपसव्य करूंन एडजस्ट करून घेत असे. मनात विचार करायचो आधी दगड होतो तो आता घोड़ा झालो म्हणजे निर्जीवातून सजीव झालो ही मोठा झालो ही मोठीच उत्क्रांति झाली न्हवे काय. पुढे घोडा ह्या शब्दाचा मतीतार्थ मी "रेसचा घोड़ा" असा घेतला आणि रेसचा घोडा जसा रेस सुरू झाल्यावर चौखुर उधळतो आणि अगदी रेस पूर्ण झाल्यावरच थांबतो तसा दोन खुर उधळलो. बी कॉम पदवी बरोबरच सीए चा अभ्यास केला. अगदी दिवसाचा पंधरा सोळा तास अभ्यास केला. डोळ्याचा खाचा होई पर्यन्त दृष्टीने धुरकट दिसे पर्यंत अभ्यास केला. मग cisa cia ह्या professional परीक्षा उत्तीर्ण होऊन वकीली करून मगच थांबलो. शाळेत असताना कुणी तरी " यमुना बाई आगाशे " अशी शिवी दिली. ती शिवी आहे है मला त्याने पूर्ण स्पष्टीकरण दिल्यावरच कळले. यमुना बाई आगाशे चा अर्थ पुढील प्रमाणे य-यडपट मु-मूर्ख ना-नालायक बा-बावळट ई-ईडियट आ-आचारट गा-गाढव शे-शेळपट ही शिवी ज्याने तयार केली त्याच मला खरच कौतुक वाटल. आयुष्यातल्या मला दिलेल्या शिव्या अजूनही संपल्या नाहीएत. काल मूली बरोबर खेळताना "आ मीना सुपर सीना" खेळताना एक टाळी चुकली म्हणून मला तिच्या कडून खुप ऐकून घ्यावे लागले. तू अगदी हा आहेस तुला काही कळत नाही. पुढे कधी जगलो वाचलो तर नातवंडा कडूनहीँ तत्सम काहीस ऐकून घ्याव लागेल आयुश्यातल्या शिव्या कधी संपत नसतात आणि त्या कधी संपूही नयेत. कदाचित आयुष्य जगण्याच हेही एक गमक आहे. म्हणूनच म्हणतो एक तरी शिवी आठवावी एक तरी शिवी आठवावी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5499
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

या काय शिव्या आहेत? आमच्या कोल्हापूरात जाता येता पालूपदासारख्या जोडण्यात येणारी एकही शिवी नाही

फारच सोवळ्यातला झाला बाबा लेख, अगदी आयडी नामाप्रमाणे. ओल्या बाल्कनीत उभे राहुन हा बघा पाऊस दाखवल्यासारखे झाले. हत्ती, घोडे, गाढव, बैल, हाल्या, हेलिकॉप्टर, डॉक्टर असल्या काही क्रियेटीव्ह शिव्या दिल्या/घेतल्या/ऐकल्या नाहीत काय?

आम्ही आमच्या टीम मेम्बर्सला दम भरताना पण शिवराळपणा हास्य निर्मितीसाठी वापरतो (म्हणजे टीम मधली खुळी तसं समजत्यात, पर आपण खच्चूनच शब्द उच्चारतो) टीम मध्ये कन्या फॅक्टर नसल्यामुळे शिवराळपणा हा टीम लंच इतका अविभाज्य घटक झालाय आयुष्याचा. बाकी प्रेमळ संवाद इथे दिले तर मालक खासगीत शिव्या देऊन आम्हाला घालवतील , नकोच त्ये झेंगट.

अत्यंत फालतू शिव्या आहेत या, शिव्यांचा सोज्वळ अपमान केला आहे. शिव्या कशा पाहिजेत, खच्चून शिरा ताणून दिलेल्या, कधी प्रेमानं दिलेल्या, भारदस्त, खौट, विचकट

ह्या ! या काय शिव्या झाल्या ? ही तर कौतुकाने दिलेली घरगुती तुपात घोळलेली विशेषणे आहेत ! :) ;) खर्‍या शिव्या म्हणजे... ****... जाऊं दे ! =)) =))

In reply to by जेम्स वांड

तश्या शिव्या दिल्या तर मग प्रतिमाभंजन वगैरे काय ते होण्याची शक्यता निर्माण होईल. त्या माहितच नसणे हे मात्र घोर अज्ञान होईल, नाय का ?! =)) =)) =))

In reply to by टवाळ कार्टा

मिपावरच्या नाठाळ भाच्यांना सांभाळणे काय येरा गबाळ्याचे काम आहे काय ?! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुतण्यांना, पुतण्यांना..... काका पुतण्याच्या करामतींना जे ग्लॅमर आहे ते दुसरीकडे कुठे नाही.

अरे कुठे नेऊन ठेवलांत रे मिपा माझा? :( मिपावरच्या शिव्या म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी सगळं जुनं मिपालिखाण जमलं नाही तरी किमान आद्य मिपासंस्थापक राजमान्य राजश्री माननीय श्री विसोबा खेचर ह्यांचे लिखाण/ प्रतिसाद निदान वाचनखूण करून वाचावेत ही नम्र विनंती. काय सांगू महाराजा, त्यांनी हा यज्ञ सुरू केला आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या कुवतीप्रमाणे त्यात आहुति टाकल्या... :) मिपावर इतके लिंकसम्राट आहेत, द्या रे लिंका इथे!!

शिवी म्हणजे कशी अणुकुचीदार दगडासारखी असली पाहिजे ज्याला दिली त्याला ती खोलवर लागली पाहीजे या असल्या शिव्या कातडी निब्बर करायला सुध्दा उपयोगी पडत नाहीत. पैजारबुवा,

----असा काही अर्थ नीघेल अस मला तेंव्हा अजीबात वाटल न्हवत. पण तस झाल मात्र खर) ---- याच्या पुढे लेख वाचता आला नाही . पण प्रतिसाद मात्र एकापेक्षा एक कडक .