मुंबई धडे - २
मुंबई धडे - २
मागच्या लेखात मी चुकून २००५ साली मुंबई ला आल्याचा उल्लेख केला आहे . मी २००६ साली कोकणातून मुंबई मध्ये आले .
जूनच्या मध्यावर साधारण क्लास सुरु झाला. मुंबई लोकलची, गर्दीची नि पावसाची हळूहळू ओळख आणि सवय व्हायला लागली. आधी कितीतरी वेळा लोकल मधून होणाऱ्या चोऱ्यांविषयी ऐकलं होत त्यामुळे जाता येता ओढणी गळ्याभोवती गोल फिरवून घ्यायचे. म्हणजे कुणी गळ्यातली चेन ओढायला नको कि ओढणी कुठे अडकायला नको. लहानपणापासून एकटीने प्रवास केला असल्याने स्वतःची नि स्वतःच्या सामानाची काळजी घेण्यास मी समर्थ होते. पण लोकल माहितीची नाही त्यामुळे एक अजाणता भीती मनात होती.
मिसळपाव