बांडगूळं
काव्यरस
बांडगूळं आधीही दिसायची…
पण, ती रानात.
राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर…
....जुन्या खोडांवर.
आता मात्र ती दिसतात
अगदी कुठेही…
म्हणजे...
रोपांवर वगैरे.
इथपर चाललं असतं
पण आता ती
यायला लागलीत
तणांवर..
माजलेल्या…
…विचारांच्या तणांवर!
संदीप चांदणे (११/६/२०१८)
वाचने
5226
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
जबरा..!! आवडली!
आईशप्पथ
चपखल !
In reply to चपखल ! by डॉ सुहास म्हात्रे
प्लस वण! एकच नंबर!
सुंदर कविता , छान
सुरेख कविता
सावध,
मस्त रे संदीप...कविता आवडली
शेवट डोळ्यात अंजन घालणारा
अगदी! अगदी!! आवडली. मस्तच.
आवडली...
भारी ! कविता आवडली. कविता
आभार!
+१
मस्तच. अगदी नेमके हाणलयं.