मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

सुट्टी

माहितगार ·
लेखनविषय:
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

चुकलो का मी?

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
दिवास्वप्न पाहत असताना अधांतराची भक्कम भूमी सोडुनी थोडा भटकत गेलो चुकलो का मी? वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी पीक पाखरे खाऊन गेली चुकलो का मी? वृत्त, छंद, गण बेड्या तोडून भ्रमरासम स्वच्छंदपणे मी फिरता, रेखीव वाट विसरलो चुकलो का मी? विस्मरणाची गडद सावली झाकोळत जरी होती तरी मी स्मरणरंजनी वाहत गेलो चुकलो का मी?

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·
लेखनप्रकार
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

तीट

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

कृष्णविवर

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
शतसूर्यांची जळती बिंबे गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे स्थळकाळाची अदय शृंखला तटतट तोडून हिंडत आहे क्षुधा अपरिमित अंतर्यामी धगधग पेटून उठली आहे आदिम स्वाहाकार सूक्त का पुनश्च अविरत गुंजत आहे? विज्ञानाचे नियम तोकडे- विपरित त्यांच्या घडते आहे भवताला घोटात गिळुनिया कृष्णविवर हे हिंडत आहे "विझत्या सूर्यावरती लट्टू नार नवेली पृथ्वी आहे" कृष्णविवर संतप्त होऊनी अथक स्वतःला कोसत आहे

राजा माझा

लाल गेंडा ·
लेखनविषय:
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड सहयाद्री असो वा सागरी राज्य करतो, राजा माझा || शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज देशी असो वा विदेशी जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥ दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी रयतेला न्याय देतो सर्वांसाठी समान, राजा माझा || हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व धर्म समान मानतो सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।। निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु मनातला तिमीर दूर करतो ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा || निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे

त्या पडद्याच्या पल्याड वसते

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते