दिवाळी अंक २०२४ :)
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही
सदरहू जिलब्या आम्ही स्वप्नातच पाडल्या आहेत
कालपर्यंत लेखकूनी कोणापाशी तक्रारी मांडल्या नाहीत
कीबोर्ड जळमटले, डोळे शिणले
संस्थळावर जिलब्यांसाठीचे आवाहन शोधित फिरलो
अभिजात भाषेचे नवे सोवळे नेसून भिरभिरलो
पण
यंदाचा दिवाळी अंक आमच्या संस्थळावर आलाच नाही...
(वरील खरडीचे एखाद्या ज्ञात कवितेशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा..)
मिसळपाव
चित्रकार कसरत
-
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा
संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले......
पण तसे काही नाही.
कृष्ण निळा निळा
बासुरीचा लावितो लळा..
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!
कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे?
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे.
त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.