मुक्तक
(π)वाट
स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता
वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते
(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो
वर्तुळाच्या गारुडाने
भूल गणिती टाकली
जटिल विद्यांची कवाडे
(π) करितो किलकिली
परीघ, त्रिज्या दोन्हीही
परिमेय असती पण तरी
(π ) का मज वेड लावी
अपरिमेयाचे परी
~~~~~~~~~~~~~
# जीवा = chord of a circle
(π) = 3.14.....
अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational
काव्यरस
कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.होडी
वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला काही तीथेच निजला
दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं
विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी
सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर
झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर
काव्यरस
चिमण्यांना सांभाळतांना
कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती
"चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं."
मनात म्हटलं,बाई बरं झालं तुमची पिढी मराठी जुने गाणं ऐकत नाही.नाहीतर दादा कोंडकेंची द्वयीअर्थी गाणी समजायला लागली तेव्हा लाजाने कससं व्हायचं.रविवारी दादा कोंडकेंचा सिनेमा असेल तर तो बंद करून ख
गुल्लक
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा.
मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.
गुल्लक.....
भातुकली खेळता,खेळता केंव्हा पुढे निघून गेली लक्षातच आले नाही.
अचानक आला
वादळाला घेऊन गेला
जपून ठेवीन मनात
काळजी करू नका
कानात सांगुन गेला
राजा राणीचा संसार. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबां आले. हरखून गेली.
काय करू, काय नको असे झाले.
तीचा आनंद तोच त्याचा परमानंद. जोडीने अदरातिथ्थ चालले होते.
आई बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
स्ट्रिंग थिअरीचा पाया
(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?
असिधारा व्रत माझे
(FunU)वादी लेखनाचे
जरी गायबलो सध्या
लोड नका घेऊ त्याचे !
एक शिक्रेट सांगतो
कोणालाही सांगू नका
(FunU)वादी लेखनाचा
माझा आ-मिपांत* ठेका !
~~~~~~~~~~~~
*आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत
प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))
काव्यरस
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.बैलपोळ्या निमित्ताने
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.
असं कुठं लिहिलंय?
मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
काव्यरस
मिसळपाव