मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजा माझा

लाल गेंडा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड सहयाद्री असो वा सागरी राज्य करतो, राजा माझा || शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज देशी असो वा विदेशी जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥ दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी रयतेला न्याय देतो सर्वांसाठी समान, राजा माझा || हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व धर्म समान मानतो सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।। निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु मनातला तिमीर दूर करतो ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा || निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे, असा, राजा माझा ।।

वाचने 1182 वाचनखूण प्रतिक्रिया 2

कर्नलतपस्वी Tue, 05/06/2025 - 03:44
निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।। आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा

In reply to by कर्नलतपस्वी

लाल गेंडा Tue, 05/06/2025 - 09:43
आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा !! हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....