मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीट

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

वाचने 2068 वाचनखूण प्रतिक्रिया 8

निनाद गुरुवार, 08/21/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम