जर्द पिवळी दुपार
लेखनविषय:
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
दूर विजनी घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
वाचने
1826
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान.
वा.
In reply to वा. by चित्रगुप्त
My take:
(जर्द पिवळी विजार)
जर्द पिवळी विजार
In reply to जर्द पिवळी विजार by वामन देशमुख
.