काठावर अज्ञाताच्या
जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
तर्कबुद्धी काजळते
कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
संज्ञा पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या
किती कोडी अवघड
चराचरात दाटती
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकती
अंतहीन अज्ञाताचे
प्रज्ञा करी दोन भाग
एक ज्ञेय- यत्नसाध्य
दुजा अज्ञेय- अथांग
मिसळपाव
एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.
इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.