तीन दिवस फक्त वादविवाद पाहुन पकलो (हा आमचा खास शब्द बर का!) कोठुन आला ते विचारु नका #:S
मिपावर एक सुंदर काव्य दिसलं आणि मोह आवरला नाही :O
सुधीर मोघे लिहितात...
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
झुलतो बाई रास-झुला!
(हो जे front pageवर आहे ना तेच)
तर माझा एक प्रयत्न
पकलो आता, फार झाला
हा बी पिळे,तो बी पिळे, तुम्हीबी पिळा
टिकेची वेणू, शिव्यांच्या टिपर्या
वाढतात वाद, तापताच काया
कोणाच्या नावावरी, कोणालाही पिळा
अर्थहीन भासे, वादाचा रंग
तर्कहीन सारे, नुसताच तवंग
चोहीकडे धगं दिसे, तरीहि बावळा
गुंतलास कोठे, कसं कळेना तू
प्रेमाची प्रार्थना,
अपचन
In reply to अपचन by अरुण मनोहर
धन्यवाद