"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?"
असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते.
"लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला.