विचार

लेखनविषय:
हे लिखाण माझे नाही, मुळ लेखक / विचारवंत पण माहीत नाही. १. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे. २. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्‍याला स्पष्ट ऐकू जाते. ३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी ४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ६. प्रेम आंधळे असतं, लग्न डोळे उघडतं. ७. देवा मला वाट पहाण्याची शक्ती दे..... आज, आत्ता, ताबडतोब! ८.

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

लेखनविषय:
लेखनप्रकार
""बाबा, सर्कसला जाऊया?'' "नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''" "शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''" "नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''" "वाघ, सिंह, हत्ती नसतात?''" "अजिबात नाही!''" "मग...सर्कसमध्ये बघायचं काय?'' "अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''" "पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''" "तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस.

झांज..

Taxonomy upgrade extras
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश

शेण कसे खावे?

लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....! ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्‍शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली.

पचका वडा

लेखनविषय:
लेखनप्रकार
खरे तर हे साहित्य "पाककृती' या कलमाखालीच प्रसिद्ध व्हायला हवे होते. परंतु, हा प्रकार खाण्या-खिलवण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त आहे, असे सांगण्यात आल्याने, पाककृतीच्या गटातून त्याचे हात कलम करण्यात आले. त्यामुळे ते या गटात प्रसिद्ध करीत आहोत. - लेखक. (वरील मताशी मॉडरेटर सहमत नसतीलच, असे नाही.) ---------- मित्रहो, आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत.

परिवर्तनाचे वारे...

लेखनविषय:
लेखनप्रकार
"कुत्र्यासारखा मारीन बघ...!' आमचा मालक अण्णा जोशानं हे वाक्‍य उच्चारलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. असे "प्राणि'वाचक उल्लेख मला अजिबात खपत नाहीत. वाटलं, एक कडकडून चावा घ्यावा आणि या जोशाला अज्ञातवासाच्या कोशात घालवावं. पण हल्लीच मला "अँटीरॅबीज' इंजेक्‍शन देऊन आणलंय मुडद्यानं ! वर स्वतःही घेतलंय. (फुकट होतं.) त्यामुळं चावणं म्हणजे नुसतंच "दात दाखवून अवलक्षण' झालं असतं. गप्प राहिलो. आमच्या जातीचा असा उद्धार केलेला मला अजिबात खपत नाही. काही लोक तर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देतात.

टाळण्याची कला

लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन... ----------- एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं.

गद्य्-काव्य

लेखनविषय:
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको......... मनाच्या विवंचनाना आज तु विचारांचा हळवा स्पर्श केलास. स्तब्ध झालेल्या सागरामध्ये क्षणात लाटांचा तांडव निर्माण केलास. मन माझ् आधिर झालं.. तुझ्या आठवणींनी बेजार झाल. परत परत त्याच वळणावर् कस काय् चालायला तयार झाल?

आयसीसी चे नवे नियम :

आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.
Subscribe to मुक्तक