लेखककाळा_पहाडयांनी बुधवार, 11/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
;) X(
याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!!
मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!!
जसा धरित्रीला वरूणराजाचा
अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा
ग्रीष्मात वृक्षांना पानांचा
आणि नद्यांना पाण्याचा.
लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ??????
फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण.
सर्वांना सहर्ष नमस्कार.
लेखकपुष्कराजयांनी बुधवार, 11/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ
शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या
कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.
लेखकभडकमकर मास्तरयांनी शुक्रवार, 06/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो....
लेखकविजुभाऊयांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड)
तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता.
तर मग वाट कशाची पहाताय ?
लेखकभाग्यश्रीयांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक(आत्मचरीत्र) वाचून हा लेख माझ्या ब्लॉग वर लिहीला होता.. तो इथे डकवावासा वाटला.. बघा कसा वाटतोय!
काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले..
लेखकगिरिजायांनी मंगळवार, 03/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आता अनोळखी होऊन गेलो आहोत आपण.. तुझा स्पर्श झालेली मी, माझा स्पर्श झालेला तू.. आणि आपला स्पर्श झालेले ते सगळे..
आता आहेत त्या फक्त आठवणी..
आधी.. सकाळी उठल्यावर पहिला फोन तुला.. जेवायच्या वेळेस फोन.. सन्ध्याकाळी फोन.. झोपण्यआधी फोन..
आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण..
तेव्हा.. रोज chatting.. खूप busy असलेल्या दिवशी सुद्धा missed call देवून.. वेळ ठरवून chatting..
आता.. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए..
आणि chatting?? बोलणच खुण्टलय तर कसल chatting??!!??
काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच..
लेखकआनंदयात्रीयांनी सोमवार, 02/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?"
असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते.
"लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला.