मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

मिसळपाव- एक कुरण..

प्राजु ·

इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..

मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..

ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

हज़ारों ख्वाहिशें ऐसी ...

आनंदयात्री ·
लेखनविषय:
मी मनात तो विषयच येउ देत नाही,अगदीच मनाचे सगळे बंध तोडुन आला जरी; तरी दुर ढकलुन देतो मी त्याला, अगदी दुर. खरे तर मी तिच्या अस्तित्वालाच नकार दिलाय..... तरीपण स्वप्नाच्या अन सत्याच्या धुसर सीमेवर ती मला भेटतच रहाते ... वेगवेगळ्या रुपातुन .. कधी सहचारिणी बनुन तर कधी अभिसारिका बनुन. कधी रागावते ओरडते तर कधी काळजी घेते, माझ्या जखमांना औषध लावते.

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

छोटा डॉन ·
लेखनप्रकार
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा "कसं जगायचं , कसं वागायचं ? कोणी सांगेल का मला ? " अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो .......... काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".

"आय टी " कंपन्या व "प्रोजेक्ट डिलीव्हरी अर्थातच मुल जन्माला घालणे ...... "

छोटा डॉन ·
च्यायला ह्या "प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या डेडलाईन " मुळे पार डोक्याची मंडई झाली पण काम काही संपतच नाही . त्या पच्छिम बंगालमध्ये चहाच्या मळ्यात राबणाऱ्या 'वेठबीगार' मजुरांच्या पेक्षा आमची अवस्था बेकार झाली आहे. ३२ तास झाले अजून घरी गेलो नाही. आमचा मॅनेजर , ती टेस्टींग टीम, तो ऑनसाईट को-ऑर्डीनेटर पार 'रक्ताची चटक लागलेल्या खविसासारखे' मागे लागले आहेत.

"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............

छोटा डॉन ·
लेखनप्रकार
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो .... * तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........ * तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........ * तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो ......... * तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो ....... * त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे ह

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ...

छोटा डॉन ·
"अभिजीत" ने छेडलेल्या "तसल्या नजरा" व त्याला पडलेले अनेक प्रतिसाद याच्या अनुषंगाने हा लेख. मला आलेल्या " विरोपाचे " स्वैर मराठी भाषांतर ......... [ हे मी लिहलेले नाही ..] [ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....] तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ... ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ... तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ... ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले. तो : हा 'तो' कोण ? ती : कमॉन यार , अजून कोण ?

आग लागो, `तसल्या' नजरेला!

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!) ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य. परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं.

"शुद्ध' काही जीवघेणे...

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
--------- व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा. मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर. पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह. किंबहुना, हट्टच. (त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.) पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली.

मी एक परिस्थिती

ऋषिकेश ·
लेखनविषय:
तसा मी इथलाच.. केव्हापासून??? पोटासाठी इथे आलो तेव्हापासून...!! इथेच घडलो.. इथेच वाढलो.. या अनोख्या भागात आता कायमचा सडलो...! काम काय? द्याल ते! जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं.. पण मला जे दोन वेळच जेवण देतं... असं वाट्टेल ते! मी इथला कसा? तुम्ही जसे इथले तसाच मीही तुम्हाला इथे मान आणि पैसा दोन्ही मिळतो मला तर केवळ पैसा त्रास सहन करतो जितका तुम्ही तितकाच मीही मी बाहेरचा का? माझी मुळं इथली नसल्याचं तुम्ही दाखवून देताय मी इथे स्वतःला रुजवू पहातोय मात्र मला इथून उपटण्याचा घाट तुम्ही घालताय ना इथला ना तिथला असं तुम्हीच जाणवून देताय..