एक स्वप्न प्रवास.....
लेखनप्रकार
एक स्वप्न प्रवास.
प्रिय ऍन
आज सन्ध्याकाळी आपण च्याट वर् बोललो त्याप्रमाणे मला सुद्धा तुला भेटायची उत्सुकता होतीच
स्वप्नात का होईना आपण् दोघे भेटणार हीच एक भन्नाट कल्पना. त्यासाठी मी रात्रीचे जेवण् अंमळ लवकरच् केले.उत्तम शान्त् ज़ोप लागावी यासाठे अंथरुण वगैरे तयारी करुन ठेवली. माझ्या रूम च्या दारावर् " डू नॊट डिस्टर्ब" अशी कागदावर लिहुन पाटीही लावुन ठेवली.तुला भेटायचे म्हणुन एक छान सा टी शर्ट् चढवला आणि तडक बेडवर अंथरुणात गेलो.
डोळे घट्ट मिटुन घेतले. तरी पण् मनात विचारांचे काहुर माजले होते.एकामागोमाग गोळीसारख्या वेगानी येणाया विचारांच्या वाहतुकीने मन खरोखर गजबले होते. हा गजबजाट मी कसाबसा शान्त् केला.
झोप् अजुनही माझ्यापासुन बरीच लांब होती. मी झोपे ला "लौकर् ये आतुरतेने.वाट पहातोय" असा एस् एम् एस् केला. झोपे ने मला लगेच् रीप्लाय केलाकी ती नेहमीच्याच् वेळेत येईल. दाबा करुन तीला माझी विनन्ती मान्य करायला लावली. तीने मला ती येईपर्यन्त् टी व्ही वर सर्वात् रटाळ कार्यक्रम लावुन ठेव म्हणुन सांगितले.मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली.
झोप् जरा जवळ् आली होती.यावेळेस् तीनेच् मला फ़ोन केला आणि म्हणाली की एकाचा अर्जन्ट् कॊल आला म्हणुन तीला यायला जरा उशीर होईल. झोपेने मला सर्वात् कंटाळवाणे पुस्तक् वाचायला सांगितले.मी "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली. वाचता वाचता मी झोपी गेलो......
या इतके ताजेतवाने मला यापूर्वी कधीच वाटले नव्हते. तुझ्याकडे येण्यासाठी मी घरातुन बाहेर पडलो. समोरुन येणाया टॆक्सी ला हात केला. आणि विमान तळाकडे निघालो.एअरपोर्ट् कडे वळणार एवढ्यात मला माझा क्लायन्ट् दिसला.तो माझ्याकडेच् निघाला होता..प्रोजेक्ट् मधल्या फ़ायनन्स च्या कोन्फ़िगरेशन् संदर्भात त्याला काही शन्का होत्या.त्या त्वरीत सोडवल्या जाणे महत्वाचे होते .ग्राहक देवो भव असे म्हणत मी त्याचे म्हणणे ऐकुन घ्यायलाच हवे होते. खरे तर त्यासाठी आमचा फ़ायनन्स मोड्युल चा कन्सल्टन्ट् आवश्यक होता.. आम्ही दोघे ही फ़ायनन्स मोड्युल च्या कन्सल्टन्ट् कडे गेलो.त्याला यासाठी कम्पनी ऒडीटर शी बोलायचे होते. त्याने त्वरीत ऒडीटर ला बोलावले. ऒडीटर अगदी बटन दाबल्या प्रमाणे विचार करायाचा अवकाश; ;त्वरीत अवतीर्ण झाला. यावेळी तो नाईट गाउन मधे होता, मी त्याला ओळखलेच नाही. ऑडीटर ही व्यक्ती नाईटगाउन मधे असु शकते . ऑडेटरला हसता येते. हाच एक आश्चर्याचा धक्का होता.
नेहमी प्रमाणे जोरदार चर्चा झाली. प्रत्येकजण् तोच मुद्दा ठासुन वेगवेगळ्या शब्दात सांगत होता.
जेंव्हा प्रत्येकाचे मुद्दे लिहुन झाले तेंव्हा मी ब्यागेत लपवलेली जादुची छडी काढली आणि कागदावरुन फ़िरवली त्यामुळे प्रत्येकाचे मुद्दे आता एकसारखेच दिसु लागले. अशारितीने सर्वांचे एकमत झाले. आणि मीटींग खूपच यशस्वी झाली.
मी आसपास पाहीले. ज्या टेक्सीत मी बसलो होतो ती आता एअरपोर्ट् जवळच ट्रॆफ़िक जाम मधे अडकली होती. मागे पुढे आजुबाजुला कुठेच् हालायला जागा नव्हती.मी ड्रायव्हरला टॆक्सी थेट विमानतळावर घ्यायला सांगितली. टॆक्सी हवेत झेपावली आणि एकदम थेट् विमानतळावर धावपटीवर उतरली.यासाठी टॆक्सीवाल्याने एकही पैसा जास्त मागितला नाही. मी सुखावलो पण थोड्याच वेळात मला माझे क्रेडीट कार्ड् १० डॉलर ने हलके झाल्याचे जाणवले.
प्लॆटफ़ोर्मवर विमान सुटण्याच्या तयरीतच् होते. मी धावत जाउन विमान पकडले.आत जाउन पाहीले तर ते खचाखच भरले होते. उभे रहायला सुद्धा जागा नव्हती.काही जण तर विमानाच्या टपावर पण बसायला तयार होते.पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
विमानाने टेक ऒफ़्फ़् केले. समोर चे दृष्य बदलले.छोटी छोटी घरे , डोंगर मागे पडु लागले. छान् निळे क्शितीज दिसु लागले . वर आकाश् खाली अथांग निळा समुद्र.विमान आता भू मध्य समुद्रावरुन उडत होते. अचानक विमानची गती थांबली कोनीतरी (रेल्वे ची ओढतात तशी) विमानची चेन ओढली होती. एका प्यासेन्जराचा लॆपटॊप् खीडकीतुन खाली समुद्रात पडला होता.
पायलट ने विमान समुद्रसपाटीजवळ खाली आणले.लॆपटॊप् लाटांवर तरंगत् होता. काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते. लॆपटॊप् विमानात घेतला गेला.पायलट ने विमान पुन्हा उंचावर नेले. आता विमान सरळ पेनांग विमानतळावर उतरले.
मी विमानातुन बाहेर आलो. कस्टम अधिकर्याने मला पासपोर्ट मगितला. या सगळ्या गडबदीत मी पासपोर्ट् विसरलो होतो.
त्या अधिकार्याने मला एका बाजुला उभे राहण्यास सांगितले.माझ्या बरोबर् आणखी दोन जण होते. पण ते मलेशियन विमान प्राधिकरणाचे कर्माचारी होते. मी त्याना सांगुन पाहीले पण् काही उपयोग झाला नाही.उलट त्यानी मला परत जायला सांगितले.
मी माझे तुझ्या स्वप्नात आजच येणे किती गरजचे आहे हे त्याना पटवुन सांगितले.त्यातल्या एकाला माझी दया आली असावी. त्याने मला दहा उठाबशा काढायला सांगितले.आणि सोडुन दिले. बरे झाले त्याने ३९ चा पाढा विचारला नाही मी त्याला तसे विचारले सुद्धा त्यावर् अतो म्हणालाकी तो त्यालाच येत नव्हत.
एअरपोर्ट वर फ़ार न रेंगालता मी बाहेर येउन सरळ् टॆक्सी केली.
तुझ्या घराजवळ उतरलो. दारावर "वेलकम" ची सुन्दर पाटी लावली होती.मी दार ठोठावले .दार म्हणाले "बेल आहे ना? मग दार कशाला वाजवता. मी बेल चे बटण दाबले कर्रर्रर्रर्रर्र-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------कर्रर्रर्रर्रर्र घड्याळात गजर वाजत होता.
त्यानेच मला जाग आली. सकाळचे सहा वाजत होते.
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......
(क्रमश:)
वाचने
12326
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
विजुभाऊ
माताय
विजुभाऊ
सही!
भन्नाट......
बाप रे , काय हो तुमची स्वप्न ही क्रमशः असतात का?
तरी हज्जारदा सांगितलंय, तुम्हाला विजुभाऊ!!
स्वप्नातली टोलेबाजी
व्हिक्टर साहेब
बोंबला
In reply to बोंबला by आंबोळी
हा हा हा
In reply to बोंबला by आंबोळी
खरे आहे हो
मजेशीर..
विजुभाऊ........
तरीच मला काल तुम्ही दिसल्यासारखे वाटलात विजुभाऊ!
In reply to तरीच मला काल तुम्ही दिसल्यासारखे वाटलात विजुभाऊ! by चतुरंग
गोविंद्य्...गोविंद्य.....
विजुभाउ...
या पुढचा स्वप्न प्रवास
लै भारी स्वप्न
मस्त....
रक्त गाभुळल्या वटवाघळांसाठी