Skip to main content

मुक्तक

गोंधळ

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 04/12/2016 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड नाशिबाचा फेरा कोणा चुकला कर्माची फळं जीवाच्या पदरा तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड पैशाचा भुकेला मनुष्य जाहला नात्याच्या भुकेला शोष पडला वेळेअभावि एकटा पडला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड तुझ्या दारी कोणी वेगळा नाही चरणी तुझ्या जीव धन्यच होई बये घे पदरी...
काव्यरस

देशभक्‍ताची व्याख्या!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/12/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात ‘1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्या’ची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले. आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही.

महेश्वरची मंतरलेली पहाट!

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 29/11/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते. 'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच! ... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच.

अमर - कथा

लेखक jp_pankaj यांनी शुक्रवार, 25/11/2016 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला. ***************************************************************************************** .केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता. केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा. पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची.

कुण्या गावचा कोण?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 24/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे. तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं. कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात! मी ही त्याच्याच सारखा 'सहज' .., म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात. एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? " मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे." गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? " मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस..

खादाडी

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 23/11/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय....... घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात. अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 16/11/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------------------------------------------------------------------------- ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल...... तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू .... दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना..... ---------------------------------------------------------------------------------------- ती : अहो हा बघा ना ...