Skip to main content

मुक्तक

तुझ्या अंतरीची (चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 06/02/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद

शब्दच केवळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 06/02/2017 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर ना ती तेज दुधारी कट्यार दु:ख्खाची मज चिरते तोवर माझे शोकगीतही शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना ती रिमझिमणारी श्रावण सर मज चिंब भिजविते तोवर माझे पाऊसगाणे शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना मज दुमदुमणारी हाक अनाहत ऐकू येते तोवर रचिले सूक्त जरी मी शब्दच केवळ, काव्य नव्हे ते प्रतिभेचे लखलखते लेणे जोवर या झोळीत न येते तोवर स्फुरला मंत्र जरी मज शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
काव्यरस

भेळ पुराण

लेखक सौरभ पारखे यांनी शुक्रवार, 03/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भेळ पुराण ... मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा...

रंगपंचमी

लेखक पराग देशमुख यांनी बुधवार, 01/02/2017 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी

अश्वत्थामा

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/01/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
था॑ब, आलोच आतले कढ आवरून सावरून ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून शहाणा मुखवटा चपखल बसवून आलोच. येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
काव्यरस

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

मी सध्या काय करतो?

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/01/2017 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या काय करतो ? नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक ! एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय!

ती एक वेडी

लेखक निओ यांनी रविवार, 22/01/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक वेडी जुन्या आठवणींचा कोष मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी एक दिवस तिच्याही नकळत हा कोष जाणिवेत आला बघता बघता त्यातनं एक सुंदर फुलपाखरू निघालं तिच्या तळहातावर अलगद बसलं अगदी विश्वासानं ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली त्याची ओळख पटवू पाहू लागली हळूच त्याने पंख मिचकावले तिला वाटलं ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे ओळख पटली ती हसली तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं त्याच्या रूपानं हरखून गेली जुन्या आठवणीत हरवून गेली एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली तीच तरुणपणातील धडधड तीच हुरहूर तीच ओढ़ तिचा विश्वास बसेना स्वतःवर पण ती तिच्या भावनांशी प्रामाणि