लेखकराजेंद्र देवीयांनी मंगळवार, 18/10/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार...
तीर तुझा घुसला आरपार
घाल तूच फुंकर हळुवारं
झाले असतील घायाळ बहू
मीच झालो तुझी शिकार
झंकारल्या तारा हृदयिच्या
सांग कसा देऊ नकार
भ्रष्ट या दुनियेत झाला
माझ्या हृदयिचा अपहार
राजेंद्र देवी
लेखकवैभव.पुणेयांनी सोमवार, 17/10/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण!
लेखकराजेंद्र देवीयांनी सोमवार, 17/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
लेखकदिनेश५७यांनी शनिवार, 15/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनात एक ‘कप्पा’ असतो. ‘आठवणींचा कप्पा’!.. उभ्या आयुष्यातल्या असंख्य आठवणी त्या कप्प्यात खचाखच भरलेल्या असतात. भरपूर साठवणक्षमता असलेल्या एखाद्या ‘पेन ड्राइव्ह’मध्ये वेगवेगळा ‘डाटा’ आपण ‘सेव्ह’ करून ठेवतो, तशा.. कधीतरी आपण तो पेन ड्राइव्ह ओपन करतो आणि जुना डाटा समोर येतो. तोपर्यंत या साठवणुकीतल्या अनेक गोष्टींचा आपल्याला पत्ताही नसतो. अचानक एखादी सेव्ह करून ठेवलेली ‘फाइल’ समोर येते, आणि ती न्याहाळताना आपण हळवे होतो..
आठवणींच्या या कप्प्याचेही तसेच असते. या कप्प्यात इतक्या आठवणी भरलेल्या असतात, हेच आपल्याला आठवत नसते. अचानक त्या कप्प्यातल्या आठवणींच्या एखाद्या फाइलवर नकळतच ‘क्लिक’ होते.
लेखकदिनेश५७यांनी शनिवार, 15/10/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
डोईवर माझ्या
नाही टोपी तरी
जगण्याची रीत
सोपी नाही ...
खांद्यावर माझ्या
नाही जरी झेंडा
कधीमधी दांडा
तिरडीचा...
हातामधी माझ्या
नाही तलवार
कसे झेलू वार
देव जाणे...
पायामधी माझ्या
उरले ना त्राण
आवरतो प्राण
कंठाशी खिळले...
मला नाही ठावे
काय माझी जात
तरी नाही जात
भूत ते भयाचे...
लेखकसुबोध खरेयांनी गुरुवार, 13/10/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -१काटा वजनाचा -२काटा वजनाचा -३काटा वजनाचा --४काटा वजनाचा --५
अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ?
अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे. आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही.
लेखकदिनेश५७यांनी गुरुवार, 13/10/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर
मन कृतीचे आगर
मन अथांग सागर
मन मधुर साखर
मन आभाळीचा रंग
मन आत्मरंगी दंग
मन देहाचा आरसा
मन स्नेहाचा वारसा
मन मायेचे माहेर
मन देवाचा आहेर
मन चंचल चंचल
मन कधी अविचल
मन मोकाट मोकाट
मन कधीचे मुकाट
मन धावे सैरावैरा
मन माळावरला वारा
मन गरीब पामर
मन कधी अनावर
मन वेडेही भासते
मन मनात हासते...
लेखकराजेंद्र देवीयांनी गुरुवार, 13/10/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्वप्न...
तुझी नाजुकता फुलात आहे
फुलाचा गंध तुझ्यात आहे
तुझी अवखळता पाण्यात आहे
पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे
तुझ्या रागाची धग आगीत आहे
आगीची तेजस्विता तुझ्यात आहे
तुझा अबोला वाऱ्यात आहे
वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे
तुझे अस्तित्व स्वप्न आहे
माझे स्वप्न तुझ्यात आहे
राजेंद्र देवी
लेखकराजेंद्र देवीयांनी बुधवार, 12/10/2016 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या निशा...
पाहून स्वप्ने उद्याची
सोकावली आहे निराशा
आता कोठे जागू लागल्यात
आठवणी जराश्या
का करीशी वणवण
या रखरखलेल्या वाळवंटात
आता कोठे विसावल्यात
उन्हात सावल्या जराश्या
आजूबाजूला कोलाहल किती
कोण ऐकेल माझे
वाचाळ झाली आता कोठे
माझी मौनाची भाषा
ना भिजते मन माझे
या कोसळत्या पावसात
राहतं नाही माझ्या
आठवणी पारोश्या
भरकटत जात आहे मी
दिशाहीन झाल्या या दिशा
दाविती उजेड मज
या अंधारलेल्या निशा
राजेंद्र देवी