Skip to main content

मुक्तक

अब तक छप्पन !

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/10/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय लष्कराने नुकतीच दहशतवाद्यांविरोधात यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केली. त्यासाठी संपूर्ण देशवासीयांनी लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. सैनिक हो !! आम्हाला तुमचा अभिमान आहे !! आता गंमत बघा. इकडे सरकार समर्थकांची छाती छप्पन इंचाने भरून आली असताना त्यावर लगेच जुन्या-जाणत्या नेत्याचे उत्तर आले. "अरे असल्या छप्पन स्ट्राईक्स केलत्या आम्ही सत्तेत असताना, पण आम्ही कधी हिशोब नाही ठेवला." बरोबरच आहे म्हणा, नाहीतरी कुठल्या गोष्टींचा हिशोब ठेवलाय यांनी आजपर्यंत?? खोटं का बोलावं..कश्शाकश्शाचा म्हणून हिशोब नाही. आता तुम्हाला वाटेल, कमीतकमी स्वतःच्या वयाचा आणि अनुभवाचा तरी हिशोब ठेवावा.

मोल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 10/10/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोल... या दुनियेत कोणी कोणाचा नाही जो तो पैशात तोलुनी पाही नव्हता मजकडे पैसा जो आजपण नाही म्हणून तर आजपण कोणी मला ओळखत नाही सारी नाती गोती बेताची ठेवून अंतरे वितांची गळाभेट तर नाहीच नाही साधी विचारपूस पण नाही या दुनियेत कोणी कोणाचा नाही मी पैशाचा वा पैसा माझा नाही राहतील फक्त शब्द माझे त्याला काही मोल नाही राजेंद्र देवी

बासरी....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 07/10/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी

नवलाई...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 06/10/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

गुपित

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 05/10/2016 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुपित थांब जरासा अजुनी अजून समईत वात आहे थांब जरासा अजुनी अजून चांदरात आहे कोमेजून जरी गेला चाफा कोमेजून जरी गेला गजरा थांब जरासा अजुनी रातराणी बहरात आहे उलटुनी गेला प्रहर रात्र संभ्रमात आहे थांब जरासा अजुनी चाहूल उदरात आहे राजेंद्र देवी

नव्या युगाची पहाट

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 04/10/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या युगाची पहाट आल्हाददायक तुझे आगमन दिनकरा, जसे आमचे बालपण तळपत असते माध्यान्य भास्करा, जसे आमचे तरुणपण मलूल असते संध्याकाळ दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण कापून टाक या किरणांनी मरिचया, संसाराचे हे मायाजाल घे कवेत मला हे अग्निरुप हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट करून टाक भस्म हा नश्वर देह अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट राजेंद्र देवी

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

ब्लॅक अँड व्हाईट

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 02/10/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल. किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे. यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं.

दोन उपास कथा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 01/10/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकः कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह. "उपवासाचे काही आहे का?" "बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत" "एक पाकीट द्या" दोनः पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली.