Skip to main content

मुक्तक

स्वरचित महाभारत : भाग शेवटचा

लेखक मिडास यांनी रविवार, 22/01/2017 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला.

अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले

लेखक खग्या यांनी बुधवार, 18/01/2017 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले, अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली.. स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली .. ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे.. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली .. रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले .. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले .. डोळयात आसवांची दाटी घडून आली कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली .. मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले .. अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..

मै कोन हूँ ?

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 18/01/2017 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
मै कोन हूँ ? "मै कोन हूँ? " हां कधी कधी चित्रपटाच्या स्मृतीभंश झालेल्या नायकाला अथवा नाईकेला पडणारा प्रश्न मला पडतो आणि मग मी स्वत थोडासा गोन्धळतो मला हा प्रश्न का पडावा ह्या विचाराने आणि मग मी स्वताला शोधायला सुरूवात करतो. तसा मी सामान्य पापभिरू मध्यम वर्गीय गृहस्थ आहे.

व्यथा- त्यांच्या आणि आमच्या !

लेखक चिनार यांनी सोमवार, 09/01/2017 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक! पण "त्यांचं" तसं नसतं. त्यांचं म्हंजे आमच्या हिंदी सिनेमावाल्यांचं! त्यांना दर्द ऐ दिल असतो (आम्हाला कोलेस्ट्रॉल असतो!).त्यांना दुनिया जीतने की तमन्ना असते (आम्हाला मंथली टार्गेट असतात!).

इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश

लेखक लीना कनाटा यांनी रविवार, 08/01/2017 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर विचार केला नुसतेच निष्क्रिय मनोरंजन (पॅसिव्ह एंटरटेनमेंट) काय कामाचे, थोडेसे सक्रिय मनोरंजन (ऍक्टिव्ह एंटरटेनमेंट) करूयात. मग मिपाचे सदस्यत्व घेतले. तत्पूर्वी आंतर जालीय स्व नव नामकरणासंबंधी चिंतन मनन चालू होते. पूर्वी शिक्षण घेताना ऍपल शास्त्रींनी प्रत्येक कृतीला इक्वल अँड अपोझिट वि-कृती असते (म्हणजे विरुद्ध-कृती बर्रर्र का) असे काहीसे सांगितल्याचे आठवत होते. तसेच या विश्वा सारखे प्रति विश्व कि काय असते, मटेरियल आणि अँटी मटेरियल ( अँटी, अँटी मटेरियल, आंटी-मटेरियल कोण म्हणतोय तो?

नाती

लेखक रोहित जाधव यांनी शुक्रवार, 06/01/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
नाती म्हंटल की आठवतात ती रक्ताची नाती. पण काही नाती ही रक्ताचा नात्यानं पेक्षा थोडी वेगळी असतात. काही प्रसंगी तर ती रक्ताचा नात्यानं पेक्षा जास्त घट्ट वाटतात. आपण आपल्या मित्राला खूप वर्षा नंतर भेटतो. बराच वेळ गप्पा केल्या नंतर आपण जायला निघतो त्याला आपले प्रॉब्लेम न सांगताच आणि मित्र बोलतो अरे जे बोलायला आला होतास ते तर बोललाचस नाहीस. इथे आपल्याला जाणीव होते की आपण न बोलताच आपल्या भावना त्याचा पर्यंत पोहोचलेल्या असतात. घरी टिव्ही वर कधी तरी एखादी क्रिकेट मैच एकदम रंगात आलेली असते.

देशाचा अपमान

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 05/01/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.

नोटबंदीचे अभंग

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 30/12/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------ पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस. . . एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.

जाणता राजा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 26/12/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.