Skip to main content

मौजमजा

२. सु.शिं.चे मानसपुत्र- दारा बुलंद

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 07/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
१. सु.शिं.चे मानसपुत्र

दारा बुलंद

मागच्या काही भेटीमध्ये सुगंधा काकूंनी (सुगंधा सुहास शिरवळकर) त्यांच्या आठवणी सांगताना एक अशीच आठवण सांगितली. जी बहुदा सुहास शिरवळकर: असे आणि तसे मध्येही आली आहे. सु.शिं.ना भेटायला त्यांचे अनेक फॅन्स महाराष्ट्र , देशभरातून आणि परदेशातून यायचे. त्यातल्या काही मुली खास करून दारा बुलंदला भेटायचे म्हणून सु.शि. आणि काकूंकडे हट्ट धरायच्या. मग त्यांची समजूत काढता काढता शिरवळकर द्वयींच्या नाकी नऊ यायचे.

कॉम्प्युटर/ व्हिडीओ गेम्स.....भाग १ (मारीयो)

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 07/04/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० च्या दशकात जन्म झालेल्या लोकांना मी नशीबवान समजतो. कारण या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना मोबाईल, काँप्युटर थोडेसे उशीरा मिळाले. त्यामुळे ते लोक मोबाईल, संगणक( हाच शब्द सोपा आहे टाईप करायला ;) ) वगैरे वापरायला तितकेसे उत्साही नसतात. २००० नंतरच्या पिढीला जन्मापासुनच मोबाईल वगैरे वापरायला मिळतो त्यामुळे इतर मैदानी खेळाला वगैरे ही पिढी तितकीसी उत्साही नसते. पण ही जी ९० च्या दशकातली पिढी आहे ना त्यांनी शिवणा-पाणी , विष-अम्रुत, लपंडाव हे ज्या उत्साहाने खेळले त्याच उत्साहाने मारीयो, कॉन्ट्रा , SD fighter , vice city खेळले. चला तर मग आमच्या पिढीने खेळलेले काही क्लासीक गेम्स पाहुया...

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 07/04/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

गेले प्यायचे राहूनी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 06/04/2016 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला. "Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली! वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात? आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं! पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग....

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 02/04/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

ओळखले का?

लेखक राजू यांनी शनिवार, 02/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ए शुक शुक" "ए अरे थांब" अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते. म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो. आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते. तर "ए" अशा एकेरी नावाने आ

<जिलबी का टाकावी>

लेखक नाखु यांनी गुरुवार, 31/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.