Skip to main content

मौजमजा

बायको कोण असते...

लेखक निओ यांनी सोमवार, 16/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार कर

सैराट - अफाट स्टोरी टेलींग

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 14/05/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा! प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून.

तर्राट

लेखक खटासि खट यांनी सोमवार, 09/05/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती १. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू). २.

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/04/2016 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 29/04/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h… ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.

जीव नांगरटीला आलाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 27/04/2016 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं घंघाळभर पाण्यानं भागंना आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण खळ्यावर आलू बांधावर फिरताना जवा सोग्यानं त्वांड पुसलं तवा म्होरल्या वावरात मला ऊसाचं कांडं रवताना उफाड्याचं सामान दिसलं आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत पायताणं तिकडं वळावली मग दगडं घेऊन गोफणीत जवारीवरं भिरकावली तसं म्होरलं वाफं सोडून सामान मधल्या आळ्याकडं आलं कंबरचा काष्टा काढून निऱ्या सावरत ताठ उभं झालं तोबरा भरुन म्या पानाचा इडा तिच्याम्होरं धरला "खाणार का इडा बिगर सुपारी, रंगणार मातुर नंबरी " काताचा खडा तोंडात टाकत म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली आन पिचकारी मारत म्हणलो "ऊस पाण्याला म्हाग " तसं सामान बां

मैथिली

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/04/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं. हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं. " हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच. "कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय? तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गच्ची

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/04/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.

सूक्ष्मकथा : जंगल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/04/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले. शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर. वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला. अन घेतला एक सूर. पाणवठ्यात. ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे. सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार. कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर. अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा. वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर. अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत. माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी. अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली. वाघ जंगलात निघून गेला. पाणवठ्यावर गर्दी.