Skip to main content

मौजमजा

उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/06/2016 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे. बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे. बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे. आपला लोभ आहेच. तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा, आपलाच मुवि

मी, किशोर कुमार आणि कराओके……

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 28/05/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.

माकडीचा माळ

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 26/05/2016 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आखरी घाणा झाल्यावर झ्याटलींग माकडाने झाऱ्या आपटला. कढईतले तेल चुर्रर झाले. चावी फिरवून त्यानं स्टो बंद केला. दुकानासमोर एक फळी आडवी टाकून त्यावर लंबी ताटली ठेवली. तयार मालाची पाटी उचलून ताटलीत रिकामी केली. भलामोठा ढिगारा झाला ! आतून एक पोतं आणून माकडाने ते भुईवर टाकलं. खाली बसकण मारून त्याने गल्ल्यातले सुट्टे पैसे चापचले. मग उदबत्ती पेटवून ढिगाऱ्यात खोचली. शमनेश्वराचं स्मरण करुन त्याने आजूबाजूला नजर फेकली. आणि " ए चला पाच रुपय किलू, पाच रुपय किलू " म्हणत जोरात वरडायला सुरुवात केली. 'झ्याटलींग भजीपाव केंद्र' तयार माल खपवण्यासाठी सज्ज झालं होतं. बाजार भरायला सुरुवात झाली होती.

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

रगडा पॅटीस

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 18/05/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
45 डिग्री सेल्सियसचा कडक उन्हाळा. फुल स्पीडच्या फॅनखालीपण घाम फुटण्याची दाट शक्यता. कॅम्पूटरवर ऑटोकॅड उघडून मशीन डिझाईन करण्यात गुतून गेलेलं एक नवीन जॉईनींग. अन पलिकडच्या टेबलावर बसलेला एक जुना बोका. "'मघधीरा' हाय कारं तुज्याकडं?" समोरच्या टेबलावर रिकामं बसलेलं एक बेळगावी सॅम्पल. हा बोक्याचा नातेवाईक. हा रिसेपनिस्ट कम प्यून कम हेल्पर कम ऑपरेटर असा ऑल इन वन बळी. बोका एक तुच्छ कटाक्ष त्याचाकडे टाकतो. अन पुन्हा कामात गडून जातो. शेडवर बसलेला कावळा क्वॉक करतो "सर, हे गिअर इथे कसे टाकायचे ?" नवीन जॉईनींगला अचानक पडलेला प्रश्न. बोका उठतो अन दोन चार कमांड टाकून सरळ गिअरच बनवून देतो.

राजाराम सीताराम एक ----------------भाग १७ - मुंबईचा मित्र

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!