Skip to main content

मांडणी

दिनु आणि जान्या आजा

लेखक दिनु गवळी यांनी शनिवार, 27/08/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी अरे!!! थांब का ईतका घाईत चालु राहिलाय . पाठीमागुन दिनुला कुणीतरी आवाज दिला .आवाज ऐकुन दिनु मागे वळला बघतो तर कुणीतरी काठी टेकत टेकत त्याच्या दिशेन येत होतं. आजुबाजुला काळोख असल्यामुळे दिनुला नक्की कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हते. जेव्हा तो म्हातारा जवळ आला तेव्हा दिनुने त्या म्हाताऱ्याला ओळखले. तो म्हातारा जान्या आजा(जनार्दन) होता. गावातील सर्वात जुना म्हातारा हाच होता. दिनुने जान्या आजाला कुठ गेला होता . म्हनुन विचारले तेव्हा जान्या आजा म्हणाला आरं पोरा मी शेताकडं गेलो होतो .रे!! येतांना ऊशीर झाला .

मनाचा एकांत - ब्लड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/08/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या

ओमरान दानीश

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 20/08/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
dan dan फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.

अतिरेक !

लेखक इल्यूमिनाटस यांनी गुरुवार, 18/08/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांचा अतिरेक झाला की मग मी कोणासोबत तरी बोलून मन मोकळं करतो, पण आज विचार केला की लिहून मन मोकळं करावं! वर्तमान पत्रात जाहिराती येतात , म्हणजे खूपच येतात. 'वर्तमान पत्रातील जाहिरातींचा अतिरेक' या विषयावर एक वेगळा लेख लिहावा लागेल! पण अधून मधून बातम्या सुद्धा येतात! नाही असं नाही! कसल्या असतात या बातम्या? दहशतवादाच्या आणि बलात्काराच्या. या दोन भयंकर समस्यांनी भारतालाच काय सगळ्या जगाला ग्रासलंय. दहशतवाद! हिंसेचा अतिरेक झाला की माणूस दहशतवादी होतो. आता या विषयावर बोलायला लागलं की आपसूकच एक वाक्य ऐकू येतं की "दहशतवादाला धर्म नसतो"! नसतोच मुळी.

अपराध मीच केला... शिक्षा तूझ्या कपाळी

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 17/08/2016 01:33 या दिवशी प्रकाशित केले.

रुस्तुम

.

संरक्षण क्षेत्र त्यामधला भ्रष्टाचार. कुणी तरी एक त्याविरुद्ध लढतो. त्यामधे खूप काही सोसतोही. रंग दे बसंतीमधे याची उत्तम हाताळणी झालेली आहे.

तसंच काही असेल अशी आशा होती कारण तशी प्रसिद्धी झाली होती. पण सुरुवातीला प्रेमकथा, नंतर अपेक्षाभंग, त्यानंतर विश्वासाला तडा. देशासाठी लढणार्‍याने देशाकडे लक्ष द्यावे की घराकडे... वगैरे वगैरे.

हॉस्टेलः एक लढा! भाग २

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 13/08/2016 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं सोप्पं होतं??? नक्कीच नाही... ------------------------------------------------------- लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय? पिरातै म्हणाल्या, 'फिल्मी वाटतंय'. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते.

हॉस्टेलः एक लढा!

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/08/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर भाषण" ह्या स्पाबंधोंच्या टिप्पणीने आम्हाला जरा अकरा-बारा वर्ष मागे नेले... जेजेत असतांना होस्टेलवर राहायला होतो. तिथेही असेच एक 'सुंदर भाषण' केले होते. त्या भाषणाची कारणे व परिणाम सांगायचा हा प्रपंच, ग्वाड मानून घ्या. जरी मी अकोल्यासारख्या शहरातून मुंबईत आलो असलो तरी मुंबईच्यासमोर अकोला म्हणजे सुमो रेसलरसमोर नुकतंच रांगायला लागलेलं पोर! मुंबैचा एक दबाव येतोच इथे येणार्‍या बाहेरगावच्या मुलांना - अपवाद पुण्याची मुले. आम्ही अकोला अमरावतीतून बारा जण आलो होतो. एकाच वर्गात होतो. होस्टेल अजुन मिळायचे होते.

आशय - प्रस्तावना आणि भाग १

लेखक किंबहुना यांनी बुधवार, 10/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आशय तसा सुखवस्तू घरातला मुलगा. वडील सधन नसले तरी सुखवस्तु शेतकरी. रत्नागिरीतील एका दुर्गम गावातील वडिलोपार्जित आणि त्यामुळे विभागलेली तरीही एकत्र असलेल्या १५-२० एकर शेतीचे मालक, आणि त्यात स्वकष्टाने पिकवलेली ५-७ एकरावरील आमराई. त्यामुळे चंगळ नसली तरी खाण्यापिण्याची तशी काही ददात नव्हती. बाकी कुटुंबीय त्यांच्या व्यवसायाप्रमाणे शहरात स्थायिक झाले होते. एकंदरीत त्यांचे आयुष्य तसे सुखी होते. ही गोष्ट तशी म्हटली तर आशयच्या आईवडिलांची नाही, पण आशयची गोष्ट समजून घेताना त्याच्या आईवडिलांना समजून घ्यायलाच पाहिजे ना. गावात तसे काही कमी नव्हते, कमी असलेच तर शिक्षण.

मिपाकरा तुमची कहाणी

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 09/08/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लहानपणी आमची आजी दर रविवारी कहाणी वाचायची. साडेतीन तांदळाचे दाणे हातात घेऊन आम्ही ती एकायचो. हळू हळू तर ती पाठ पण झाली होती कहाणी. श्रावण सुरु झाला की कायम त्याची आठवण होते. हळूहळू मिपाशी एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते आहे... त्या भावनेतूनच ही कहाणी सहज सुचली आणि इथे देत आहे.. गोड मानून घ्यावीत. ************************************************************************************** एका मिपा करा देवा तुमची कहाणी. आटपाट संकेत स्थळ होत. त्याच नाव मिसळपाव होत. त्यातील सदस्यांची नावं अगम्य होती. हॉटेलात येणाऱ्या-जाणाऱ्यांची आवड विविध.... तरी एक होती. कंपूबाजीची आवड काहीजणांना होती.

ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

लेखक पी महेश००७ यांनी मंगळवार, 19/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं. एनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही.