Skip to main content

मांडणी

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 01/06/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लाकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोक्स् त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य! कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात! आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं.. मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय...

धन्यवाद गानू…

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 31/05/2016 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील... एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही. गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत... मी म्हणालो, ठीके पाठव आत.. शटर अर्धवट उघडून गार्डनी पाठवलं त्या माणसाला आत... मी विचारलं चेक आहे का उत्तर नाही, पासबुक आणले का उत्तर नाही... डिमांड ड्राफ्ट आहे पण त्यावरून कॅश देणे जमणार नाही... कैशियर नाही, दिवासभराचा लेखाजोखा सम्पलेला आहे, उद्या या... हे ऐकून तो माणूस भडक्ला... अहो परिस्थिती समजून घ्या, मला पैसे हवेत हॉस्पिटलसाठी, तुम्हाला कळत नाही का...

वेष्टणावरील छापील किंमत - एक साळसूद फसवणूक !?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 30/05/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
MRP उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 30/05/2016 02:08 या दिवशी प्रकाशित केले.

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

पैसे परत मिळाले की नाही? ते कोणी लाटले?

... आता माझ्यातला कमांडर जागा झाला. कार्डासोबत मिळालेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे धडाधड फोन लावले. कार्ड ब्लॉक केले! त्यात सांगितलेल्या प्रमाणे कार्डाचे २ तुकडे करून फोटो पाठवले. कार्ड माझ्या खिशात असताना पैसे खटाखट गेले कसे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते! तोवर भाच्याला कल्पना दिली. आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळीच ७ दिवसाच्या सहलीला जायचे कॅन्सल न करता त्याला डॉलर्सची व्यवस्था करून पैसे आणायला विनंती केली.

इंटरव्यू

लेखक अज्ञात यांनी रविवार, 29/05/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
• कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात. • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा...

हरवले ते गवसले का ? व कसे ? भाग - 8 लक्षाधीशाचा भिक्षाधीश!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 27/05/2016 00:13 या दिवशी प्रकाशित केले.

हजारो रूपये डोळ्यासमोरून धडाघडा जाताना पाहण्याचे भाग्य (?) कपाऴी आले!!!

मित्रांनो, खालील धागा वाचला आणि मला माझ्या विदेशातील प्रवासात बसलेला हिसका आठवला...! Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत.. आणि माझ्या जीवनातील हरवलेल्या गोष्टींत या कथानकाची भर पडली! आता काळ जखमाभरून काढणारे 'मलम' म्हणतात ते खरे आहे याची प्रचीती आली. पण आज 'पैसै परस्पर काढले गेले' हा धागा वाचला आणि त्या जखमेची खपली निघाली आणि आता ती कहानी सादर करायचे ठरवले असो.

फक्त लढ म्हणा !!

लेखक रमेश भिडे यांनी गुरुवार, 26/05/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची. ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत. . . आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात.

उनाड दुपार

लेखक अज्ञात यांनी रविवार, 22/05/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
उनाड दुपार - भाग १ झोप... छे! झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत.

दन दन दनाट झिंगाट सैराट..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 17/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं.

ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 16/05/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
LPGHomemakerपरिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या. दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण.