Skip to main content

मांडणी

असे 'रामभाऊ' सगळ्या शाळांना मिळोत!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 15/05/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामभाऊ आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभाऊ! श्रीमुखात मोजून तीन-चार दात, कपाळाला स्तंभा सारखा उंच गंध, कदाचित टक्कल असावं, कदाचित म्हणतोय कारण त्यांना त्यांच्या त्या खाकी गांधी टोपी शिवाय कधी पाहिलेच नाही. दाढी एक एमएम वाढलेली, एका कानाला अत्तराचा कापूस, कंठाला अंगारा, पायात कोल्हापुरी, आता सर्वात महत्वाचं म्हणजे... त्यांचा एक खांदा दुसऱ्या खांद्यापेक्षा जरा वर असायचा नेहमी, त्यामुळे विशेषतः मागून त्यांना पाहिलं की नेहमी देव आनंदचा भास व्हायचा!

ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

लेखक पुणे मुंग्रापं यांनी बुधवार, 11/05/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 09/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/05/2016 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सादर करीत आहे, रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग! १ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात! २ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार. ३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप. ४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न. ५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज. ६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे

आता वाटली ना काळजी ?

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते .. ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली , मेसेज करायला विसरली .

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/05/2016 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते! दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील… पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला. युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप.

'प्लॅटफॉर्म'

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 03/05/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात!

गो बाय

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 30/04/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी ) गो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेलेल्या एका माणसाला उमेद मिळाली. गो बाय तूला आठवतय का. पोटात असताना तू गर्भ सन्स्काराची सी डी ऐकायचीस अगदी शान्तपणे. कधी कधी खूप मस्ती करायचीस आईला लाथा मारायचीस मग मी कसलस स्तोत्र म्हटल की शान्त व्हायचीस अगदी शहाण्या बाळा सारखी. मग ०५/०३/१२ ला तू आलीस अगदी तुझ्या मावशी आजीच्या तारखेला तू आलीस. लोक म्हणाले बहीणीच्या तारखेला तिची आजीच परत आली.

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 22/04/2016 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद. या पुणे विभागाच्या अनुदिनी गटाच्या अभिनव प्रयोगाची पावले मिसळपाव.कॉम, मायबोली.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम या मराठी संकेतस्थळावरही या निमित्ताने पडली हे विशेष. या सर्व संकेतस्थळांवरही या प्रयत्नाचे चांगले कौतुक झाले. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातूनही या अनुदिनीच्या लिंक्स सर्वत्र फिरत होत्या हे या अभिनव ध्वनी अनुदिनीचे यशच म्हणावे लागेल.