मिपाकरा तुमची कहाणी
लेखनप्रकार
आमच्या लहानपणी आमची आजी दर रविवारी कहाणी वाचायची. साडेतीन तांदळाचे दाणे हातात घेऊन आम्ही ती एकायचो. हळू हळू तर ती पाठ पण झाली होती कहाणी. श्रावण सुरु झाला की कायम त्याची आठवण होते. हळूहळू मिपाशी एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते आहे... त्या भावनेतूनच ही कहाणी सहज सुचली आणि इथे देत आहे.. गोड मानून घ्यावीत.
**************************************************************************************
एका मिपा करा देवा तुमची कहाणी. आटपाट संकेत स्थळ होत. त्याच नाव मिसळपाव होत. त्यातील सदस्यांची नावं अगम्य होती. हॉटेलात येणाऱ्या-जाणाऱ्यांची आवड विविध.... तरी एक होती. कंपूबाजीची आवड काहीजणांना होती. त्यामुळे काही धाग्यांची चंगळ तर काहींची धावपळ होत होती. मात्र मराठी साहित्याची रेलचेल इथे भरपूर होती.
एकदा काय झालं..... तर काहीच नाही झाल. मागच्या पानावरून पुढचं पान सुरु झाल. साहित्य, काव्य, चर्चेपासून पाक.. तंत्र... भटकंतीपर्यंत नवं लेखन येत राहिलं. संपादक मंडळ चाळणी लावत राहिलं आणि मराठी अभिव्यक्ति स्वातंत्र्य प्रत्येक सदस्याला मिळत राहिलं.
आपली ओळख लपवून किंवा उघड करूनही प्रत्येकजण प्रामाणिकपणे काही ना काही लिहित राहिलं. काहींनी वेळ नसल्यामुळे तर काहींनी नाराजीने संकेत स्थळ सोडलं. पण मिपा करांच्या कमेंट्स विसरण त्यांनाही कधी शक्य नाही झालं.
अशा ह्या मिपा वर कायम त्यांच्या भूत... वर्तमान सदस्यांच खूपच प्रेम राहिलं.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
वाचने
1966
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
डू.आय.डींचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध...
In reply to डू.आय.डींचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध... by मुक्त विहारि
केला आहे की,मिपावर 'भूत'
In reply to केला आहे की,मिपावर 'भूत' by संत घोडेकर
'भूत' सदस्यांचे खूप प्रेम आहे.....
के
In reply to के by स्पा
=)) बोके.
काथ्याकुटाचा शतकी धागा बनवण्यासाठी चांगला प्रयत्न आहे...
गोग्गोड कहाणी
कसलं भारी
In reply to कसलं भारी by विप्लव
हो ना.
चांगलंय
सरसावून कहाणी ऐकायला बसलो, तर