ओमरान दानीश
फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते. आपले चिमुकले पाय घेवून तो तिथल्या खुर्चीवर बसला खरा, पण चेहर्यावर कसलेच भाव नव्हते,......
त्याच्या वेदना जणू काही थिजून गेल्या होत्या. त्यावेळी त्याच्या मनात काय चाललं असेल याची कल्पनाच करवत नाही. त्याची निशब्दता अजूनच मन विषण्ण करून जाते. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मरण पावलेल्या चिमुकल्या
'आयलन कुर्दी' आणी आता हा 'ओमरान दानीश' हे दोघेही जगाच्या षंढ होत चाललेल्या मनोवृत्तीचे बळी आहेत. ओमरान नशीबवान होता म्हणुन वाचला पण आयलन दुर्दैवी होता, तुर्कस्तानच्या किनार्यावर त्याचं शव असं पडलं होतं कि, पाहण्यार्याला वाटेल हि एवढा निरागस जीव कधीही उठेल आणी आपल्याकडे पाहून हसेल..... काय चूक आहे या निष्पाप जिवांची, जे त्यांना असे हाल भोगावे लागतात. ऐन खेळण्या- बागडण्याच्या वयात जीव वाचवत देशातून परागंदा व्हाव लागतंय. आयलन आणि ओमरान यांची झालेली वाताहत जगासमोर आली म्हणून माहीत तरी पडली, असे कित्येक आयलन ना जीव वाचवत समुद्र पार करताना त्याच्या उदरात जल समाधी मिळाली. असंख्य ओमरान दहशतवाद्यांच्या गोळ्यांना, लष्कराच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडले, आईबापांना मुकले आहेत. घरा-दारांपासून आपल्या गावापासून निर्वासित होत छावण्या मध्ये आश्रय घेत आहेत. सीरियात राहणार्या लोकांची अवस्था खालच्या फोटोत अगदी सही-सही दाखवली आहे.
दहशतवाद हा सगळ्या जगाला लागलेला रोग आहे, याचा नायनाट जगतल्या सर्वानी मिळून केला तर हा रोग दूर होणं शक्य आहे नाहीतर असे कित्येक निष्पाप जीव जातील याची गणती नाही.
फोटो : गुगल साभार
वर्गीकरण
:(
युद्ध जेव्हा दारापर्यत पोचतो
:(
या मुलाचा फोटो जेव्हा जेव्हा
एकदम सुन्न...निशब्द..
:(
राजकारण निर्ढावलेल्यांचे होते
या मुलांबद्दल सहानुभुती आहेच
In reply to या मुलांबद्दल सहानुभुती आहेच by अस्वस्थामा
+1
In reply to या मुलांबद्दल सहानुभुती आहेच by अस्वस्थामा
अगदी अगदी.
In reply to या मुलांबद्दल सहानुभुती आहेच by अस्वस्थामा
मेलेल्यांच्या टाळूवरच लोणी