Skip to main content

मांडणी

कुंती, द्रौपदी आणि सीता... काळ आणि परिस्थिती

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 02/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
(पिशी अबोली यांचा लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता हा लेख वाचला आणि मनात आले की रामायण आणि महाभारत काळातील रूढी, प्रचलित कथा आणि कल्पना इथे मांडाव्यात. लेडी सीमोर यांचे आयुष्य संघर्षमय आणि शारीरिक आणि मानसिक दुःखमय गेले. पण तरीही त्यांनी जिद्दीने आपली बाजू समाजापुढे मंडळी... ही खरच मोठी गोष्ट आहे. प्रस्तुत लेखात कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याबद्दल मी आजवर जे वाचले आहे ते लिहिले आहे. हा धागा लिहिण्याचा उद्देश इथे चांगली चर्चा व्हावी एवढाच आहे. जर वाचकांकडे काही वेगळी माहिती असेल तर मला समजून घ्यायला नक्की आवडेल.) दुर्वासांची सेवा केल्याने त्यांनी कुंतीला एक वरदान दिले.

वियोग-कविता

लेखक मारवा यांनी बुधवार, 30/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वियोग या विषयावरील काही जुन्याच कविता आज पुन्हा वाचत होतो या शेअर कराव्याश्या वाटल्या सहज म्हणुन हा धागाप्रपंच केला. बघा एखादी तार जुळते का तुमचीही. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा संग्रह "निशा निमन्त्रण" हा मला फ़ार भावतो. या संग्रहातील कवितांचा काळ तसा फ़ार जुना आहे साधारणत: १९३७-३८ मध्ये लिहीलेल्या या कविता आहेत. बच्चन यांच्या विख्यात " मधुशाला" आणि "मधुबाला" नंतर लिहिलेल्या कवितांचा हा स्वतंत्र संग्रह आहे. या कविता संग्रहाला तुलनेने कमी प्रसिद्धी मिळाली बहुधा. तर मजजवळ असलेल्या निशा च्या आवृत्तीला स्वत: बच्चन यांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतुन या संग्रहातील कविता त्यांची पार्श्वभुमी इ.

जग घूमेया थारे जैसा ना कोई |

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 23/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या रुटीन आणि आपाधापीच्या या जागालगतच एक दुसरं जग आहे, इष्काचं जग. ते जग तर्काच्या पलिकडे आहे. ती का आवडते, सांगता येत नाही. तिच्या सहवासाची जादू शब्दांच्या पलिकडे आहे. आणि तो एक न संपणारा सिलसिला आहे. कधीकधी तर दोघात इतकी खोल दरी येते की आता सगळं संपलं असं वाटतं. पण तो किंवा ती कधी आस सोडत नाहीत. हा एकतर्फी जोश तसाच कायम राहातो. दुसर्‍याचा प्रश्नच नाही ! तुमची लगनच तुमचं सर्वस्व असतं.

टपली अन टिचकी.

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 17/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी घरी घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात.

ग्रंथ परिचय - ग्रामगीता भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 14/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 पुढे चालू...

ग्रामगीता

भाग 2 विविध पंचक योजनाकरून गीतेचे विषयानुरूप आठ विभाग पाडले आहेत, ते असे - पहिल्या सद्धर्म पंचकात देव, धर्म, आश्रम, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था यावर भाष्य आहे. दुसऱ्या लोक वशीकरण पंचकात संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवा सामर्थ्य, आणि संघटना-शक्ती याचा विचार केला आहे. तिसऱ्या ग्रामनिर्माण पंचक

ग्रंथ परिचय - ग्रामगीता

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 10/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथ परिचय - ग्रामगीता 1 ग्रामगीता ऍपवर मराठीतील पुर्ण गीता वाचायला क्लिक करा. वंदनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज विरचित युग परिवर्तन कार्य मित्रहो, नुकतेच एक ग्रंथराज वाचनात आले. त्याचा परिचय करून द्यावा आणि ज्यांना आधीपासून या ग्रामगीतेची महती ज्ञात आहे, त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा ही इच्छा.

!! माझ्या सवता !!

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 08/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान
काव्यरस

!! आता !!

लेखक कवि मानव यांनी शुक्रवार, 04/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझी कोणाला तमा होतच नाही प्रियजन म्हणून मी "त्यांना"...केली थोडीशी घाई, मी जगलो ज्यांच्यासाठी ते दूरवर निघून गेले, आता खांद्यांवर घेउनी ओझे, घरट्यात एकटा राही !! इमारतीच्या माडीमध्ये कधी तरी दरवळतो ही गंध , तिथल्या भिंती ही साक्षी, मी कैसा होतो बेधुंद, पण जसे पावसात गज गंजावे तश्या गांजल्या सऱ्या नाती, पडक्या इमारतीला आता परत दुरुस्ती होणे नाही !! पारिजात होऊन दारी, मी घातला सडा फुलांचा, घेऊन आश्रय माझा, काही पिल्ले मोठी होत होती, जे बळ आले त्या पंखांना, खग होऊन ते ही उडाले, सारे तसेच होते नंतर ही तरी पारिजात पुन्हा मोहरले नाही !! आयुष्याच्या या वळणावरती आता हा एकटेपण छळतो, "माणूस
काव्यरस

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 28/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.