Skip to main content

कविता

आजही मला ते सर्व आठवतय

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 05/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय.... Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो Canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या café मध्ये जायचो Café बंद असला की परत Canteen मधलंच येऊन गिळायचो Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत आमच्या group ला मात्र मुलींची तशी allergy होती कदाचीत college कडून ती आमच्या group ला झाली होती चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो ज्याची copy केली आहे त्याच्या

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 05/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र अ अ अनशापोटी आ आ आवळा खाल्ला इ ई इथे बसलाय्? उ ऊ उड्या मारतोय्? ए ए एकदा सांगून ऐ ऐ ऐकत नाही! ओ ओ ओरडतोय् औ औ औषध द्याला - अं आं आंबटशोक अ: आहा आंगलट आला! छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
Taxonomy upgrade extras

संध्याखंत

लेखक नंदन यांनी रविवार, 03/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :) "गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत
Taxonomy upgrade extras

व्हॅलेंटाईन्स डे....

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

झांज..

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 01/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

सांज..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

आपलं माणूस

लेखक संगीता यांनी बुधवार, 30/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता माझ्या मैत्रिणीने लिहिली आहे. आनंदात असताना सुखात भागीदार कुणीही चालतं पण दु:खात रडताना अश्रू पुसायला आपलंच माणूस लागतं घोळक्यात असताना दंगामस्ती करायला कुणीही चालतं पण एकांतात असताना गुपित सांगायला आपलंच माणूस लागतं वरवरच्या जखमांना फुंकर घालायला कुणीही चालतं पण मनात खोलवर रुतलेल्या जखमांना आपलंच माणूस लागतं काळाच्या अंधारात विरणार्‍या आठवणींसाठी कुणीही चालतं पण मनाच्या कप्प्यात घर करण्यासाठी आपलंच माणूस लागतं कायमचंच रुसण्यासाठी अबोला धरण्यासाठी कुणीही चालतं पण आपल्यावर रुसण्यासाठी रुसवा आपला काढण्यासाठी आपलंच माणूस लागतं यशाच्या शिखरावर बेहोश होण्यासाठी कुणी
Taxonomy upgrade extras

मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 30/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले

मैत्रीण माझी.

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे माझा अनुभव मी मान्ड्त आहे. वाचावा हि विनती.

जिवन

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम हे होत नसत प्रेम हे कराव लागत आपल अस कुणीच नसत आपलस कराव लागत...! एकदा तरी स्वाताहून वादळात झोकयच असत नाहीच हाती आल तर त्याच वादळात मानोसक्त मारायला शीकायच असत म्हनूनच.......! प्रेम हे होत नसत प्रेम गे कराव लागत आपल अस कुनीच नसत आपलस कराव लागत.......... कस वाट्ल प्रतिक्रिया पाठ्वा.