मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजही मला ते सर्व आठवतय

धमाल मुलगा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय.... Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो Canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या café मध्ये जायचो Café बंद असला की परत Canteen मधलंच येऊन गिळायचो Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत आमच्या group ला मात्र मुलींची तशी allergy होती कदाचीत college कडून ती आमच्या group ला झाली होती चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो ज्याची copy केली आहे त्याच्या आधीच जाउन submit करायचो खुप आठवतात ते दिवस... सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की डोळ्यात टचकन् पाणि येतं............. ------------------------------------------------------------- ऋणनिर्देश : कवी- अनामिक (निदान माझ्यासाठीतरी) मला आलेल्या एका विरोपातून. - ध मा ल.

वाचने 6117 वाचनखूण प्रतिक्रिया 9

विसोबा खेचर Wed, 02/06/2008 - 08:08
खुप आठवतात ते दिवस... सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की डोळ्यात टचकन् पाणि येतं............. हम्म! कविता ठीक वाटली... आपला, (कॉलेजकुमार) तात्या.

खुप आठवतात ते दिवस... सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की डोळ्यात टचकन् पाणि येतं............. या ओळी आवडल्या.......आमचा बी एक अभ्यासु गृप होता कॉलेजात !!! ( मित्र अभ्यास करायचे आणि आम्ही कँटीनला चला चा आग्रह करायचो ) निरोपाच्या वेळेस लै रडलो, च्यायला त्या वेडेपणाबद्दल आता हसायला येतं :) कॉलेज आन विद्यापीठातला मित्र/मैत्रींनींच्या गृपचा लिडर दिल्या...sss

In reply to by नाना चेंगट

स्पंदना Mon, 07/30/2012 - 09:09
जग पुढे गेल नाना. तुम्ही हिमालयातुन जाउन येइतो येथे बरीच उलथापालथ झाली. ता.क. (ता.मा. लिहिल पाहिजे.) धमु घरी डोक्टर डोक्टर खेळतोय.

मस्तच कविता... अवांतरः धमाल रावांनी केलेली काव्य विभागातील लुडबुड बिलकुल पसंत पडलेली नाही. असे करुन त्यांनी आम्हा गरीबांच्या पोटावर पाय देऊ नये इतके बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो. ;)