संध्याखंत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :)
"गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे
सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत
वाचने
10061
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान कविता
मस्तच..
सायबा,
In reply to सायबा, by विसोबा खेचर
:)
फार सुंदर
In reply to फार सुंदर by धनंजय
असेच
सुरेख
विशेष
वा! नंदन! तुझे अभिनंदन!
धन्यवाद
सुंदर कविता
खूप आवडली
सुंदर
क्या बात
किती सुरेख लिहितस!
आयला, हे कसं काय सुटलं
वाह
सुरेख!
नंदन