मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव- एक कुरण..

प्राजु ·

बेसनलाडू 25/02/2008 - 02:15

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 26/02/2008 - 21:11
म्हणतो..

लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.

(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव

विसोबा खेचर 25/02/2008 - 07:34

प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)

कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.

क्या बात है...!

इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..

असो...

आपला,
(मेंढपाळ) तात्या.

धमाल मुलगा 25/02/2008 - 12:28
प्राजुताई, झकास! कुठून सुचत॑ बॉ तुम्हा लोका॑ना एव्हढ॑ छान लिहायला?
एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))

एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.

हे एकदम मस्त.

स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..

च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्‍याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?

(कुरणातली शेळी)प्राजु

ह.ह .पु.वा.

-कुरणातल॑ नाठाळ कोकरू
ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

ऋषिकेश 26/02/2008 - 00:25

असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प

-(ऑड मॅन)ऋषिकेश

राजमुद्रा 25/02/2008 - 12:43

किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?

आज तू मला अशी वाटलीस-

मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?

तू म्हणालीस पाण्यासारखा, 

लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता, 

पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.

राजमुद्रा :)

प्राजु, मस्तच जमली आहे कविता...

हे मात्र एकदम चपखल बसले आहे.

बिपिन कार्यकर्ते.

विसोबा खेचर 25/02/2008 - 14:03

ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.

अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्‍या इतक्या सार्‍या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!

मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!

असो...!

आपला,
(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.

किशोरी 25/02/2008 - 14:24

अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहे
वा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....
(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी

माझी दुनिया 25/02/2008 - 16:48
अरे वा ! माझाही उल्लेख आला की. अर्थात तो नसता तरी कौतुक केलं असतंच.मस्तच जमलीय कविता.

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

शेळीताई,

कुरण आवडले......

छोटी टिंगी ;)

अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का? 

In reply to by ब्रिटिश टिंग्या

प्राजु 25/02/2008 - 20:19

अरे धनंजय काळा..  शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.

- (सर्वव्यापी)प्राजु

कुरणात उतरली चारोळ्यांची परी.

खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.

असाच सर्वांचा लोभ असूद्या.

प्राजु 25/02/2008 - 19:57

आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..
राजमुद्राताई,
तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.

बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच

सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता 

तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी 

शंका नाही.

*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे : 

http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm

In reply to by सृष्टीलावण्या

प्राजु 25/02/2008 - 20:25

अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध   "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची 

सवयच आहे... असो.

तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...

अभिनंदन प्राजु.

प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.

धन्यवाद.

छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!

आगे बढते रहो...

तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!

बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))

काय मस्त लिहिली आहेस ग? एकदम सही$$$$ तुझ्या भाषेत.
खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे.
नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)
काय आहेत ते कळेल.....:)
फारच छान.

दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.

अवलिया 26/02/2008 - 19:05

मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)

नाना

मुक्तसुनीत 26/02/2008 - 21:36

कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :

"असेच काही द्यावे.... घ्यावे....

म्हणून दिधला एक मरवा..."

रंजन 29/02/2008 - 22:45

याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.

In reply to by रंजन

आयला, मेंढरांची तर हिथं लयलूटच हाय!  काही आपखूशीनं येणारी मेंढरं आनी काही स्वतःला न कळत येणारी मेंढरं!!!!!! :))

लबाड मुलगा 01/03/2008 - 15:50
च्यायला अपन जरा ङ्याक्चीक मधे फिराय्ला काय गेल्तो तर कुर्णातुन अप्लया नावाचआ पत्ता क्ट प्राजु.... हे चांग्ला नाय याचा तुला लय त्रास हुइल हा.... सांगुन ठिव्तोय अपन यक्दम डेंजर हाय पक्या

मस्तानी 13/01/2011 - 03:50
प्राजू ... आता "आजचे नवीन खेळाडू" घेऊन अशीच एक सही रचना होऊन जाऊ दे :) या नवीन "शोध" सुविधेमुळे असंच काही जुन - चांगलं वाचायला मिळतंय सध्या !

In reply to by मस्तानी

स्वानन्द 13/01/2011 - 09:36
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर आणल्याबद्दल. एवढी मस्त कविता वाचायची राहून गेली असती. बाकी याचा सिक्वेल येऊन जाऊ देच.

सुधीर काळे 14/01/2011 - 08:42
प्राजू, तुझ्या धमन्यात कविता दौडत असते याचाच प्रत्यय पुन्हा आला! वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा.. ही ओळ वाचल्यावर जरासे 'आँ' झाले होते (कारण 'म्या पामरा'ने कुठल्याही वाटा फोडल्या-बिडल्याची जाणीव तरी नाहीं) पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले.

अरुण मनोहर 14/01/2011 - 09:32
छान कविता आहे. अदृष्य मेंढरू असण्याचे फायदे नेहमीच मिपावर मला मिळतात. पुन्हा एकदा तो फायदा देण्यासाठी प्राजूचे अभिनंदन. संपादित-> अरेच्चा! हा धागा दोन वर्षांनी वर आणण्यात आला आहे तर! पण एनी वे, आमचे अदृष्य पणाचे फायदे अजूनही तसेच सुरू आहेत. नो प्रॉब्लेम!

इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..

मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..

ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..

...का?

चतुरंग ·
प्रदीप कुलकर्णींची कविता "...का?" ही आमची प्रेरणा - ..................................... ...का?

एक नेपाळी गीत...

मनस्वी ·

In reply to by आनंदयात्री

परीचा परा 20/02/2008 - 18:36
आम्हाला नाही तसे वाटत... उलट ह्यात कौतुकच दिसते आम्हाला... नेपाळी लोकांचे वॉचमन ह्या उद्योगातील वर्चस्व स्पष्ट करणार्‍या ओळी आहेत या... तेव्हा आम्ही मनस्वी यांच्या बाजूने आहोत... माझी खात्री आहे की त्यांनी ते केवळ आणि केवळ चांगल्याच हेतूने लिहिले आहे.... नेपाळी लोकांना वॉचमनगिरीशिवाय दुसरे काही येत नाही असा निष्कर्ष कोणी काढू नये असे आम्हास वाटते... {परीच्या प्रतिक्षेत} परा

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 20/02/2008 - 18:38
दिलेले साहित्य पूर्ण पने विनोदाच्या भावनेने दिले असल्याची आमची समजूत आहे ........... त्यामुळे त्यात "निषेध" व्यक्त करण्यासारखे काही नाही ........ त्यामुळे आपण "व्यक्त केलेल्या निषेधाचा " आम्ही " निषेध" करतो .... [ जास्त सिरियसली घेऊ नका .....] अवांतर : काय डोंबलाचा फरक पदतो हो निषेध व्यक्त करून ? निषेध व्यक्त करण्यामागची गंभीरता भारत सरकारच्या धोरणामुळे हरवून बसल्याने त्यात काही मजा राहिली नाही .... निषेध व्यक्त करणे आज एकदम पूचाट वाटते ....

In reply to by छोटा डॉन

झकासराव 21/02/2008 - 13:37
अगदी बरोब्बर. मी ज्यावेळी यदाकचाचित पाहिल होत तेव्हा ह्या निषेध व्यक्त करतोची अतिशय उत्तम खिल्ली उडवलेली होती. त्यावेळी कारगील प्रकरण घडले होते. आणि निषेधाचा वहिवाटीचा हक्क तत्कालीन पंताप्रधान वाजपेयी यांच्याकडे होता. कविता आवडली. विनोद आहे झाल. जास्त गंभीर असु नये ह्या बाबत. नाहितरी असे सरदारजीचे विनोद असतातच की. त्याना आपण विनोद म्हणूनच बघतो हे ही तसच. :) अवांतर : तात्या शेठ खरड वही बघा. आज मातृभाषा दिन आहे.

मनस्वी 20/02/2008 - 19:03
नेपाळींनी ह्या व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी कायम ठेवली आहे. ही त्यांच्यासाठी श्रेयास्पद बाब आहे. (निषेध धुडकावणारी!) मनस्वी

कविता मस्तच आहे. नेपाळ भेटीत तिथल्या एका नेपाळ्याशी झालेल्या चर्चेत मी माझे निरिक्षण त्याच्या नजरेस आणून दिले होते की, 'नेपाळी माणसे, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, गाईड हे भारतियांपेक्षा परदेशीयानाच जास्त महत्त्व देतात. भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते असे का?' त्यावर तो म्हणाला, 'ह्याला भारतीयच जबाबदार आहेत. ते नेपाळ्यांना सन्मानाने वागवत नाहीत. त्यांच्या दृष्टीने नेपाळी म्हणजे सोसायटीने नेमलेला 'गुरखा' त्याला काय महत्त्व द्यायचे?' काही अंशी मला त्याचे म्हणणे पटले. परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 20/02/2008 - 19:28
परंतु ह्या कवितेकडे विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहावे. कारण भारतात येणारे कित्येक नेपाळी 'धूतल्या तांदूळासारखे' किंवा तितके 'भरवशाचे' नसतात. तेंव्हा कवितेकडे अवाजवी गंभीरतेने पाहण्याची गरज नाही. तेच म्हणते मी!

विसोबा खेचर 21/02/2008 - 01:20
मस्त कविता आहे.. ही कविता वाचून प्राणच्या मुखी असलेलं किशोरदाने गायलेलं, 'हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है एक मेमशाब है मेमशाब शुंदर शुंदर है...' असं काहीसं एक गाणं आहे, ते आठवलं! :) आपला, तात्या कोईराला.

अनिला 21/02/2008 - 14:35
बन्गाली मणसाला शायरीची आवड होती. पण त्याला कोणी प्रो त्साहन देत नव्हते. तरीपण त्याने मित्राला आग्रह केला म्हणून त्याला एक सेर पाट। करायला दिला ना मै गिला करता हू ना मै शिकवा करता हू तू सलामत रहे ये दुवा करता हू दुसरा दिवस ना मै गीला कुरता हू ना मै सूखा कुरता हू तू साला मत रहे ये दुआ मै कुरता हू

मनस्वी 21/02/2008 - 15:56
मला "घरवाली बाहरवाली" मधल अनिल कपूर आणि सतीश कौशिकचं गाणं आठवलं - नेपालमें बजे ताली, बंबईमें पडे गालीऽऽ काहीच्या काहीच होतं अगदी. मनस्वी

(मला विरोपातून आलेले)
नेपाळी गीत

(चाल: सुनो गौर से दुनियावालो)

शुनो गोर शे दुनियावालो

चाहे कितने महल बना लो

उश के आगे लॉन उगा लो

उश के आगे गेट लगा लो

उश के आगे होंगे हम नेपाली!!!!

खर्डेघाशी

बेसनलाडू ·

बेसनलाडू 20/02/2008 - 11:53
कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:18
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:12
छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 12:29
फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

अविनाश ओगले 20/02/2008 - 19:58
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.

ऋषिकेश 20/02/2008 - 20:04
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश

वरदा 21/02/2008 - 07:47
बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....

3

श्रद्धांजली!

अशोक गोडबोले ·

विसोबा खेचर 19/02/2008 - 22:24
धन्यवाद गोडबोलेमास्तर! आता पुसेल जगि सह्यकडा कुणास तेजोमयी सदन हे गगनी उदास थांबेल हा क्षणभरी प्रिय मेघदूत आकाशवेल चपला चमके क्षणात केवळ अप्रतिम कविता...! स्नेहांकित, तात्या.

चतुरंग 20/02/2008 - 00:18
अशोकराव, वृत्तबध्द, डौलदार, गेय आणि सहज सोपी रचना केवळ सुंदर! वसंत बापटांसारख्या कवीला ह्यापेक्षा सुंदर श्रध्दांजली काय असू शकते? आपल्या कविता वाचण्यास उत्सुक आहे. चतुरंग

कविराज वसंत बापट गेले तेव्हा या ओळी लिहिल्या होत्या.

शब्देविण संवादिजे...

अशोक गोडबोले ·

लिखाळ 19/02/2008 - 20:59
सोंग झोपेचे घेऊन स्वप्न सुंदर पडेना देह-भूमिती जाणून मन-गणित सुटेना शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा वा वा ..सुंदर कविता. फारच सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

विसोबा खेचर 20/02/2008 - 06:49
भरी रांजण स्वार्थाचे घुसे मग तो दिंडीत टाकी रुपये चोरीचे वारकर्‍याच्या झोळीत पापपुण्याचा करावा हिशेब ना कधी कोणी गणिकेच्या गळ्यातून येती गंधर्वाची गाणी क्या बात है! सुरेख कविता...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 07:33
कविता, अतिशय आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्राजु 21/02/2008 - 07:12
डोके चालविण्या आधी भिंत चालवावी लागे हीच ग्यानबाची मेख करी झोपलेल्या जागे शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा या ओळी खूपच आवडल्या...! - प्राजु

सोंग झोपेचे घेऊन स्वप्न सुंदर पडेना देह-भूमिती जाणून मन-गणित सुटेना पडे पैशाचा पाऊस सूर कोरडा राहिला घाट बांधायाची हौस देव दगड जाहला भरी रांजण स्वार्थाचे घुसे मग तो दिंडीत टाकी रुपये चोरीचे वारकर्‍याच्या झोळीत पापपुण्याचा करावा हिशेब ना कधी कोणी गणिकेच्या गळ्यातून येती गंधर्वाची गाणी डोके चालविण्या आधी भिंत चालवावी लागे हीच ग्यानबाची मेख करी झोपलेल्या जागे शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा --अशोक गोडबोले, पनवेल.

मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)

लिखाळ ·
नमस्कार, एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे. शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :) आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप व्यथा परि तव आज मानिनी ................... नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का? आभारी, --लिखाळ.

हृदयाच्या अंतर्हृदयाला....

सृष्टीलावण्या ·

आनंदयात्री 18/02/2008 - 15:36
बर्‍याच दिवसांनी बालकवींची ही कविता वाचली. नाव फक्त "दिव्य औषधी कसली त्याला " असे आहे असे स्मरते.

विसोबा खेचर 18/02/2008 - 18:39
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! वा! छान आहे कविता... अवांतर - मिसळपाववर बालकवी, कुसुमाग्रज, भाईकाका आणि इतरही अनेक प्रतिभावंताच्या/दिग्गजांच्या साहित्याचे स्वागत आहेच हे प्रथम नमूद करतो. परंतु त्याचबरोबर सभासदांनी खास त्यांचे स्वत:चे असे काही लेखन येथे केल्यास ते मिसळपावला अधिक आवडेल, किंबहुना मराठी मंडळींना त्यांचे स्वत:चे साहित्यिक, वैचारिक लेखन येथे करता यावे हाच मिसळपावचा मुख्य उद्देश आहे... हिंदी, उर्दू, संस्कृत यांसारख्या भाषेतल्या साहित्यिकांची मराठीतून ओळख तसेच त्यांच्या साहित्याच्या मराठी रसग्रहणाचे/ भाषांतर-अनुवादाचेही मिसळपाववर स्वागत आहे... तात्या.

कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।। येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! - बालकवी

शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू ·

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.

'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

आठवणीतली कविता

सृष्टीलावण्या ·

ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.

In reply to by सृष्टीलावण्या

आपल्या आठवणीतील कविता सुंदर आहे, त्यासोबत डकवलेले चित्रही तितकेच सुंदर आहे.
चित्रातला  घाट पाहिला  आणि आम्हाला कसा-या घाटाची आठवण झाली.पावसळ्यात अशीच निसर्गाची मुक्त उधळण तिथे पाहवयास मिळते.
>> ह्या कवितेचे कवि कोण

कवीची माहिती नसली तरी ती आपल्या आठवणीतील कविता आहे,असा आपण उल्लेख केला आहे.  त्यामुळे ती कविता कोणाचीतरी आहे इतके आम्हाला कळले आहे. शोध घेणा-यांनी  त्याचा शोध  घेत राहावा. बाकी कोणाला आवडला असेल / नसेल पण आपण ज्यांच्यासाठी वापरला असेल/ नसेल तो चिंतातुरजंतु  हा शब्द आम्हाला फार आवडला !!! आनंदीजंतु प्रा.डॉ.... ..........

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र ताम्हणी घाटाचे आहे आणि चिंतातुर जंतु हा शब्द गोविंदाग्रजांचा आहे. चित्र मला पण बेहद्द आवडते पण मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोभारीत (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते. "चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन.

In reply to by सृष्टीलावण्या

लिखाळ 18/02/2008 - 22:01
"चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन. वा नक्कीच द्या...वाट पाहत आहे. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

आठवणीतल्या कविता नावाचे ४ (किंवा कदाचित ५) भागात प्रसिध्द केलेले पुस्तक उपलब्ध आहे. त्यात कदाचित या कवितेबद्दल माहिती मिळू शकेल. त्यात माझ्या आवडीच्या अनेक कविता आहेत. "गायी पाण्यावर काय म्हणून आल्या" अशी सुरुवात असलेली "माझी कन्या" नावाची कवि 'बी' उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता किंवा 'कठीण समय येता कोण कामास येतो' ही रघुनाथ पंडीत यांची कविता. या त्यामधे आहेत. पं. दुर्गादास आसाराम तिवारी यांच्या 'गोकलखां लढनेवाला','मोहरा इरेला पडला','एक काळ ऐसा होता','फेकला तटाहून घोडा' अशा अनेक कविता पण त्यामधे आहेत. ता.क. वर उल्लेखित कवि आणि कविता यांचे नाते माझ्या घोर अज्ञानानुसार वेगळे असू शकते. (चू.भू.द्या.घ्या.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यातील कविता साधारण १९७५ च्या बालभारती पर्यंतच्या आहेत. त्यात ही कविता नक्की नाही. गाई पाण्यावरच्या आठवणीने मन भरून आले. ती कविता माझ्या मोठ्या बहिणीला होती, मला नव्हती. पण संध्याकाळी परवचा, पाढे, शुभंकरोति, रामरक्षा म्हणताना कविता पण म्हटल्या जायच्या. त्यामुळे पुढे अभ्यासक्रम बदलला तरी मला तिच्या बालभारतीच्या अनेक कविता मला पाठ होत्या.

लिखाळ 17/02/2008 - 23:57
काय मस्त कविता ! मस्त शाळेतले दिवस आठवले. अजून अश्या जून्या कविता वाचायला आवडातील. प्रकाशचित्रंसुद्धा फारच उत्तम. अशीच एक माझी आवडाती कविता म्हणजे 'फूलपाखरु छान किती दिसते..' आणि एक चिमणीची कविता होती 'माझा घरटा कोणी नेला....' ---- लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

चतुरंग 17/02/2008 - 23:59
साधी, सोपी, छान कविता आणि बरोबर तितकेच छान प्रकाशचित्र. धन्यवाद. चतुरंग

In reply to by चतुरंग

ह्या कवितेची एक आठवण म्हणजे साधारण १९८४ च्या काळात ठाण्याजवळील येऊर निर्जन अरण्य होते जिथे वाघ फिरायचे, तिथे माझे आजोळ होते. तिथल्या घाटातून जाताना आम्ही मोठमोठ्याने ही कविता म्हणत / कोकलत जायचो.

'आवडतो मज अफाट सागर अथा॑ग पाणी निळे निळ्या जा॑भळ्या जळात केशर साय॑काळी मिळे फेस फुला॑चे सफेद शि॑पीत वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळीतो किती द॑गल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या स॑गती स॑थ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तूफान जेव्हा भा॑डत येते सागरही गर्जतो त्यावेळी मी चतूरपणाने दूर जरा राहतो खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा-ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी दूर डो॑गरावरी चमकती निळे जा॑भळे दिवे सा॑गतात ते मजला आता घरी जायला हवे..घरी जायला हवे' -कुसुमाग्रज

प्राजु 19/02/2008 - 00:22
वावा.. डॉक्टरसाहेब.. अहो ही कविता माझा जीव की प्राण होती. आणि आवाज जरा बरा आणि थोडीफार संगिताची जाण असल्याने शाळेत सगळ्या कवितांना मला चाल लावून म्हणायला सांगत आमचे सर. ही कविता मी फारच छान म्हंटल्याचे त्यानी कौतुकाने आमच्या मुख्याध्यापकांना सांगितले होते. आणि मला त्यांच्याकडून शाबासकी मिळाली होती. मला अजून एक आठवते ती कविता म्हणजे.."बाभळी" बाभळी सारख्या काटेरी विषयावर इंदिरा संतांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. इथे देत आहे.. लवलव हिरवीगार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे.. - कवयित्री इंदिरा संत.

धन्यवाद 'प्राजू'. या अशा काही कविता होत्या की ज्या एकदा वाचल्या की आपोआप पाठ होत असत. 'माणूस माझे नाव माणूस माझे नाव बि॑दूमात्र मी क्षुद्र खरोखर परि जि॑कले सातही सागर उ॑च गाठला गौरीश॑कर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव' -बाबा आमटे तशीच हि॑दीमधील हरिव॑शराय बच्चन या॑ची.. 'चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते,पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत हम भारत कि अमर जवानी सागर कि लहरे॑ लासानी ग॑ग जमुन के निर्मल पानी सब के प्रेरक रक्षक मीत चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते पा॑व बढाते मन मुस्काते गाते गीत..' पुढील स॑स्कृत ओळी अशाच.. 'रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेष्यति हसिष्यति प॑कजश्री इत्थ॑ विच॑तयति कोषगत द्विरेफे हा ह॑त ह॑त नलिनिम गज-उज्जहारः' (खूप वर्षा॑नी स॑स्कृत लिहित असल्याने चुका असण्याची शक्यता आहे)

विसोबा खेचर 19/02/2008 - 10:20
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। वा! सुंदर कविता... आपला, (तिसरीतला) तात्या.

हो...मी तिसरीत असताना (१९८३) घाटातली वाट ही कविता शिकलोय... मस्त कविता..झक्कास फोटो... मला माझ्या दहावीच्या काही आवडत्या पण अर्धवट आठवणाया कविता द्याव्याशा वाटत आहेत...

घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। - बालभारती इ. ३ री (१९८४)