Skip to main content

कविता

मिसळपाव- एक कुरण..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 25/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..

मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..

ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..

...का?

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 21/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींची कविता "...का?" ही आमची प्रेरणा - ..................................... ...का?
Taxonomy upgrade extras

एक नेपाळी गीत...

लेखक मनस्वी यांनी बुधवार, 20/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(मला विरोपातून आलेले)
नेपाळी गीत

(चाल: सुनो गौर से दुनियावालो)

शुनो गोर शे दुनियावालो

चाहे कितने महल बना लो

उश के आगे लॉन उगा लो

उश के आगे गेट लगा लो

उश के आगे होंगे हम नेपाली!!!!

शब्देविण संवादिजे...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 19/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सोंग झोपेचे घेऊन स्वप्न सुंदर पडेना देह-भूमिती जाणून मन-गणित सुटेना पडे पैशाचा पाऊस सूर कोरडा राहिला घाट बांधायाची हौस देव दगड जाहला भरी रांजण स्वार्थाचे घुसे मग तो दिंडीत टाकी रुपये चोरीचे वारकर्‍याच्या झोळीत पापपुण्याचा करावा हिशेब ना कधी कोणी गणिकेच्या गळ्यातून येती गंधर्वाची गाणी डोके चालविण्या आधी भिंत चालवावी लागे हीच ग्यानबाची मेख करी झोपलेल्या जागे शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 19/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे. शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :) आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप व्यथा परि तव आज मानिनी ................... नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का? आभारी, --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

हृदयाच्या अंतर्हृदयाला....

लेखक सृष्टीलावण्या यांनी सोमवार, 18/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।। येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला ! - बालकवी
Taxonomy upgrade extras

शीर्षक सुचत नाही - २

लेखक बेसनलाडू यांनी रविवार, 17/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

आठवणीतली कविता

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 17/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। - बालभारती इ. ३ री (१९८४)