Skip to main content

...का?

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 21/02/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींची कविता "...का?" ही आमची प्रेरणा - ..................................... ...का? ..................................... आडवा झालोच मी हलकेच अन् देह माझा चादरीने झाकला...! पसरला अंधार तो ...माझ्यावरी - -का तुझा तो 'बा' असा हा वाकला? व्यर्थ धडपडशील तू माझ्यासवे भान याचेही तुला नाही जरी... मी असा तुज...सवेही हिंडतो - - का हिंडतो तो घेउनी सोटा करी? शेज ही भासेच काटेरी जरी स्पर्श तो होताच अन् झाली कडी..! आग आहे अंतरी, बाहेर ही - - का बडवुनी हा सोलतो ही कातडी? वेळ भेटीची चुकीची आपली... वाट लागे आज माझी हे दिसे मम जाणिवा ह्या बधिर होती - का तरी सोटा जरी पाठी बसे? मीच खोलीतून निसटू पाहतो बघ कसा तो दार लावी आयते... झेपावता मग त्या गवाक्षी - - का धावलो मग 'लावुनी' मी पाय ते? जाळती आतून-बाहेरुन या... मारण्याच्या, झोडण्याच्या वेदना काय शिकलास "रंग्या" सांग तू - - का मम ललाटी भर्जरी ही वेदना? -चतुरंग ............................................... रचनाकाल २० फेब्रुवारी २००८ ...............................................
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2343
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

चतुरंग, यू टू??? सह्हि.. - प्राजु.