मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

लिलीची फुले

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मी पाहिले....! लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे....! - पु. शि. रेगे

छातीत निर्भय श्वास दे...

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील "वेध महामानवाचा" ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता. कवि अज्ञात.

झोप २

बुध्दू बैल ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वडापावरावांच्या(आधीचे पाणीपुरी) झोप ह्या कवितेमुळे खडबडून जागा झालो व उत्साहाच्या भरात कविता सुचत गेली स्वप्ननगरीत माझ्या मी सोन्याने न्हाऊन निघालो आईने पाणी शिंपडल्यावर खडबडूनि जागा झालो स्वप्ननगरीत माझ्या ताकाचे प्याले मी प्यालो जरा जास्तच प्यायल्यामुळे खडबडूनि जागा झालो जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप मी माझ्या मायदेशी आलो मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून खडबडूनि जागा झालो जेव्हा खरोखर जाग आली तेव्हा कळले झोपेत होतो आई म्हणाली मला माझी मी झोपेत बडबडत होतो -(सूर्यवंशी) बुध्दू बैल

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...

तू (अर्थात त्याच्या नजरेतून ती...)

सतिश गावडे ·
लेखनविषय:
तू परत येणार नाहीस हे मला केव्हाच कळलं आहे माझं वेड मन मात्र अजून तसं तुझ्यातच गुंतलं आहे माझाच मूर्खपणा होता तो सारं काही गृहीत धरलं मी डोळे मिटून अंधा~या रात्री झणी शिडात वारं भरलं मी कसा दोष तसा देऊ तुला मी तुझं तसं काहीच चुकलं नाही पण मी तरी सांग काय करू पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही कशीही होवो तशी माझी अवस्था तुझंच भलं असेल मनात माझ्या हसेन इथे मी लपवून आसवाना जखमा असतील जरी मनात ताज्या जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा पडतील जिथे जिथे पाउले तुझी, असू दे हळूवार मखमलि गालीचा

कधी होवो न होवो भेट यापुढे आपली...

सतिश गावडे ·
लेखनविषय:
माझा प्रत्येक निवांत क्षण तसा तुझ्याच आठवणींनी सजलेला मनाचा प्रत्येक कोपरा तसा, तुझ्या आठवणींच्या दव बिंदुत भिजलेला अस कधीच झालं नाही तसं आधी मी मलाच हरवून बसलो आहे आता कळेना मला अशी काय जादू केली तू प्रत्येक चेहरा तसा तुझाच वाटतो आता चाहूल कुणाची जेव्हा कधी लागते मला तू आल्याचा भास होतो मला तसा आता पाना फुलांत, नदी ओढ्यात, सागराच्या फेसाल लाटेतही दिसतेस् मला तू आता कधी होवो न होवो भेट यापुढे आपली तुझा चिवचिवाट कानात गुंजेल माझ्या अवचित मंद झुळुक येता वार्‍याची तुझं निखळ हासू कानात घुमेल माझ्या

आता पुढे काय?

रम्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओर्कुटवर आलेली कविता!! आत्ता पुढे काय ? आर्य आले द्रविड़ गेले ....द्रविड़ गेले मुग़ल आले मुग़ल गेले इन्ग्रज़ आले .....इन्ग्रज़ गेले कांग्रेस आले कांग्रेस गेले NDA आले ....NDA गेले UPA आले आत्ता पुढे काय .....? सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली whisky गेली scotch आली.....scotch गेली champagne आली आत्ता पुढे काय .... ? नौवारि गेले सहावारी आले .......सहावारी गेले mandakini वारी आले mandakini वारी गेले midi आला.......midi गेला mini आला mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? (पुढचा विचार करणारा) रम्या

संत - कुसुमाग्रज (एक विलक्षण अनुभव)

मानस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रसिक मिसळपावकरांनो, ही कविता मी "महामानवाला प्रणाम!" ह्या अंतर्गत प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. एका वरिष्ठ मित्राच्या बर्‍याच आग्रहामुळे येथे पुन्हा देत आहे. थोडे फार फेरबदल (जसे आठवले, तसे) केले आहेत. माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. बाबांच्या निर्वाणाची बातमी वाचली, तेव्हा ह्या कवितेची खूप आठवण झाली आणि म्हणुनच हा सगळा अट्टाहास. काही वर्षांपुर्वी (खूप वर्षांपुर्वी) कुसुमाग़्रजांनी नाशिकमध्ये श्री. बाबा आमटे ह्यांचा सत्कार घडवून आणला होता.

आम्ही कोण?

धोंडोपंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो, "आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील.