मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

(वय साठावं लागलं की)

चतुरंग ·
लेखनविषय:
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा!

पाऊस..

पद्मश्री चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे.. पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...

वय सोळावं सरलं की.....

अनिरुद्ध अभ्यंकर ·
लेखनविषय:
वय सोळावं सरलं की सगळं हिरवं दिसू लागत स्वतःभोवती गिरकी घेत मनात पाखरू वसू लागत वसंताच्या बागेमध्ये चाफा केवडे फुलू लागतात फुलां भोवती पिंगा घालण्या भवरे ही जमू लागतात न बोलता प्रत्येकाला सार काही कळू लागत वय सोळावं सरलं की..... पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते प्रेमाची ही आगळी भाषा प्रत्येकजण बोलू लागत वय सोळावं सरलं की..... पहिला वाहिला पाऊस अन पहिली वाहिली प्रीत असते प्रत्येकाच्या ओठांवरती धुंद एक गीत असते ओलाचिंब मन तेव्हा वार्‍यावर झुलू लागत वय सोळावं सरलं की..... हिरव्या हिरव्या पानांमध्ये सळसळणार वारं असत तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली.

पावसाळ्यातील एक दिवस

अजिंक्य ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला, पाऊसही आला मजला, उठवण्या ||१|| आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट, धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी ||२|| गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट, बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ||३|| अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर', गाडीस मिळेना जोर, धावण्या ||४|| पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प, 'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ||५|| एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत, पकडली घराची वाट, सगळ्यांनी ||६|| माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून, 'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ||७||

पावनखिंड

घाटावरचे भट ·
लेखनविषय:
पावनखिंडीच्या रणसंग्रामाला काव्यात बंदिस्त करण्याचा हा एक क्षुद्र प्रयत्न प्रेरणा: मनीषतैंची ही कविता आणि अर्थातच राजा शिवछत्रपती

रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले काही हरवून काही गवसण्याचे दिन आले पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले श्रीकृष्ण सामंत

इथले प्रत्येक क्षण.!

अंकुश चव्हाण ·
लेखनविषय:
इथले प्रत्येक क्षण मानवी संवेदनांना हादरा देणारे असतात... आणि तरीही सर्वजण नेहमी मरुन जगत असतात. इथले प्रत्येक क्षण... दंगली होतात, बॉम्बस्फोट होतात. भेसळयुक्त सिमेंटच्या इमारतीखाली आणि कधी पावसाच्या मा-याखाली माणसे शेकड्याने मरतात. इथले प्रत्येक क्षण... जखमी, मृतांच्या नावाने अनुदान जाहीर केली जातात. मदतीच्या नावाखाली मंत्री स्वत: चीच खळगी भरतात. इथले प्रत्येक क्षण... लोकही थोड हळहळतात सरकारच्या नावाने बोटे मोडतात. नंतर पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागतात. इथले प्रत्येक क्षण... स्वप्न ऊध्वस्त होताना बघतात. जीव मुठीत धरून जगतात. हे आता नित्याचच झाल आहे असेच सारे म्हणतात...

भुमीपुत्र...

अंकुश चव्हाण ·
लेखनविषय:
भुमीपुत्रच भूमीहीन झालाय, दाही दिशांना वणवण फिरतोय. लोकांचे पोट भरणाराच आज उपासमारीने मरतोय. शेतक-याचा पोर उपाशी शेतक-याच्या देशामध्ये. कुपोषणाच्या वेषात बालमृत्यू थैमान घालतोय. बँकांकडून कर्ज घेतले दुष्काळाने लादली नादारी. घाव हा दुहेरी प्रवृत्त आत्महत्येला करतोय. सरकारी अनुदाने होत आहेत मंत्र्यांच्या तिजोरीत बंद. कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या घरादारावर नांगर फिरतोय. श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी नवस सायास केले जातात. गरीब शेतक-याला आपण पद्धतशीर विसरतोय.