मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस..

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे.. पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...

वाचने 4262 वाचनखूण प्रतिक्रिया 10

आनंदयात्री Mon, 08/11/2008 - 17:15
>>ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो >>रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. ऑस्सम !!! अजुन काय म्हणु ? ओल्या मनात माझ्या खासच :) .. तुझ्या कवितेच खासियत अशी की ती कविता त्यातल्या अशाच एखाद्या युनिक कल्पनेमुळे लक्षात रहाते !! लै लै आवडले.

बेसनलाडू Tue, 08/12/2008 - 01:48
नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके या ओळी फारच छान. खूप आवडल्या. कविता अगदी चिंब करणारी आहे :) (ओलाचिंब)बेसनलाडू

मदनबाण Tue, 08/12/2008 - 12:29
ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. या ओळी तर फारच आवडल्या.. (चिंब भिजलेला) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अजिंक्य Tue, 08/12/2008 - 16:47
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त... फारच छान! प्रत्येक ओळीतून हळूहळू उंची वाढवत नेऊन, झकास शेवट केलाय. सुरेख कविता! -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.

मनीषा Wed, 08/13/2008 - 22:56
कविता छान आहे... अगदी तुझ्या नावासारखी पाउस... नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. सुंदर !!!

राघव Fri, 10/29/2010 - 11:22
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त... अजून काय म्हणणार.. ब्येश्टेश्ट!!