Skip to main content

कविता

भेट .....

लेखक फिझा यांनी सोमवार, 01/06/2020 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
भेट ..... सागर गोटे अन भातुकली आठवते का ग आता ? किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले असतील अजून पण ...... तुझ्या वहीतल्या पहिल्या पानावर माझे नाव लिहिताना किती खाडाखोड ? ...पहिल्याच ओळीत ! आणि नंतर, पान भरून लिहिलेलं ... ! जेव्हा पुन्हा भेटशील तेव्हा 'ती वही' घेऊन ये ..... पानावरची 'तारीख ' सोडली तर ... अजून काही जसंच्या तसं शिल्लक आहे का हे तपासून पाहूया ...... नसेल तर ......... तर ..... मला कसलेही प्रश्न नको विचारू ... ... ! तुझ्या मनातल्या प्रश्नांपेक्षा .... माझ्या डोळ्यांसमोर उभे असलेले प्रश्न ..... खूप मोठे असतील कदाचित .......

का न व्हावे मी स्वतःच सूर्य !!!

लेखक अमोल_००३ यांनी शुक्रवार, 29/05/2020 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
का न धरावे मी मनी धैर्य | का न व्हावे मी स्वतःच सूर्य || धृ || अंधकार दाटला भोवती घोर अज्ञानाचा, काय करावे, काही न समजे मार्ग प्रकाशाचा, प्रज्ञाही ती कुंठित झाली या संग्रामात, काळालाही अखेर केला साष्टांग प्रणिपात, अशा समयी मनीमानसी बाळगावे स्थैर्य, का न मी बाळगावे स्थैर्य || १ || वाट पाहिली अनेक दिन मी, अनंत अन् रात्री, कितीदा तरी अन् संपून गेलो केवळ क्षणमात्री, हरवूनि बसलो कधी मी मला गूढ विचारात, आणि कधीतरी शोधित बसलो अपार निराशेत, अशा समयी अंतर्यामी जागवावे शौर्य, का न मी जागवावे शौर्य || २ || दिसता कधीतरी एक शलाका प्रकाश किरणाची, होते नकळत

ढासळला वाडा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/05/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
खालील फोटो पाहून सुचलेली कविता: ढासळला वाडाफोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune ढासळला वाडा ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या टणक होते जूनेर ल
काव्यरस

।। मातृदशक ।।

लेखक अमोल_००३ यांनी गुरुवार, 28/05/2020 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी | जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ || नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा | न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ || हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले | शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ || कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा | स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ || निरपेक्षभावे मनासि | दिले अखंड ज्ञानासि | अज्ञानी या मुलासि | शहाणे केले || ५ || जैसी घार पिलांसि | जैसी वेल फुलांसि | तैसे जपले मुलांसि | सावधपणे || ६ || घडल्या चुका जरी हातून | मार्ग दाखविला त्यातून | जेणेंकरुन त्या परतून | न होणे कधी || ७

बायका...

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 27/05/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात. तशा म्हणजे नेमके कशा, म्हणून शोधु लागलो, बायका. पुराणात, प्राचीन ग्रंथात, ऑफिसात, समोर- मागे, इथे तिथे. गुगलवर. अगदी मिपावरही. असतात बायका, हळव्या, खंबीर,धीट आणि तितक्याच कर्तबागरही. बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही काहींनाच जाणवतात, खोल-खोल श्वास, अन् ते शब्द. काहींना नाही इतकाच, फरक असतो त्या, मुक-संवादाचा. बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. आदिम काळापासून सोबत आणि शिवाय, सुरु असलेल्या बायकांचा समर्थ प्रवास अव्याहतपणे. बायका म्हणजे अस्वस्थ तगमग. लिहिता येत नाही त्यावर कविता, लेख.
काव्यरस

चक्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 27/05/2020 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू आभाळात किती सांडले केशर सोनसळत्या सकाळी निळे झळाळे अंबर तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार धूसरशा संध्याकाळी अदृष्टाची हुरहूर नि:शब्दाच्या चाहुलीने जागे रात्र काळीशार प्रहरांच्या रंगी रंगे बिलोरी हे कालचक्र चक्रनेमिक्रम त्याचा अनादि नी निरंतर
काव्यरस

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

आत्तापर्यंत काय केलं?

लेखक मनिष यांनी सोमवार, 25/05/2020 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं, अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख. असंच खूप काही, मनापासून ठरवलं. धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं. डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं, आत्तापर्यंत काय केलं? अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, आत्तापर्यंत काय केलं? ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो, त्यांनाच खांदा देऊन आलो. सरणावर थोडा, मीही जळून गेलो. पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले. नकळत अशीच कित्येक वर्
Taxonomy upgrade extras

यंत्र

लेखक निखिल आनंद चिकाटे यांनी सोमवार, 25/05/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

कोंकणची वेदना..

लेखक अभिबाबा यांनी सोमवार, 25/05/2020 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
करोनाचा हा रोग, त्यावर अनेक प्रयोग! काय भोग आहेत भाळी, याच काळी, काही कळेना ! हरेक समजतो इथं मीच अ‍ाहे बरोबर! सैनिक तरी कोविडचे आहेत का सुरक्षित खरोखर ? रेड आणि कंटेनमेंट झोनमधून बाहेर जायलाही नाही परवानगी.. पण सरकारच्या चातुर्यामुळे कोंकणात मात्र होऊ शकते रवानगी.. बाटलीतील राक्षसाला प्लीज सोडू नका बेलगाम.. कोविड बियाणं नाही संपवलं तर होतील गंभीर परिणाम.. राजधानीत नाही झेपलं, मग ही असुरक्षित घिसाडघाई इथे कशाला? कोरोनाचा भस्मासूर कोकणच्या का उशाला?