तुझं माझं घर...

लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं घर...एक झोका कधी निळ्याशा ढगांत, कधी पाचूच्या बनात. तुझं माझं घर.... एक फुलबाग कधी प्राजक्ती सडा कधी धुंद केवडा. तुझं माझं घर ... एक चांदणं कधी टिपूर टिपूर कधी गंधाळ आतूर. तुझं माझं घर... एक पाऊस कधी झिम्माड झिम्माड कधी कोसळ द्वाड. तुझं माझं घर.... एक मैफिल कधी तुझिया सुरात कधी माझिया तालात. तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास जयश्री अंबासकर

प्रतिष्ठा

लेखनविषय:
काव्यरस
प्रतिष्ठा
निष्ठेला लावून तिष्ठा, बघ राज्य करी प्रतिष्ठा | ही वसते सर्व जनात करी जागृत 'अहं' क्षणात राखाया मर्जी हिची ना स्वकीयांची ही क्षिति ||१|| हे मित्र होते हो कधी पण आली प्रतिष्ठा मधी आज नजरेत यांच्या गरळ एक शब्द ही न ये सरळ ||२|| उन्मत्त गर्व अन माज हे स्तवन शब्द ही धरी वाढवी वर्चस्व भू-वरी तडतडा तांडव करी ||३|| चालता तुम्ही आदर्शे ही हळूच तुम्हा चिकटते आल्हादे मोह पाडुनी ती अधिकृत ठाण मांडते ||४|| मग आदर्श हो दुय्यम अन करिती जन तडजोड कसे चिकटता तिज तुम्ही हे सुटत नसे हो कोड ||५|| साऱ्या आयुष्याचा खेळ मोडते एका घडी

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

काव्यरस
युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम
हिरो: तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब तुझ्या डोईचे केस हाय लांब तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग तू कोनाची प्वार हाय सांग ||१|| हिरोईन: तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२|| हिरो: तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चा

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

काव्यरस
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

काव्यरस
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता हातातल्या हाता अहो सोडा हातातल्या हाता नाथा हातातल्या हाता ||धृ|| मनाचीये गुंत्यामधे होssओssहोssओ मनाचीये गुंत्यामधे नका अडकू आता नाथा सोडा हातातल्या हाता ||१|| आले जरी दुरवरूनी आssआssआssआss आले जरी मोहीम करूनी का बळेची ओढता नाथा आता सोडा हातातल्या हाता ||२|| सासू सासरे दिर जावा हंssअंssअंssअंss सासू सासरे दिर जावा बोल बोलतील असे एकांती पाहता नाथा आता नका....नका सोडा हातातल्या ह

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

काव्यरस
मंडळी, कव्वालीचा 'लुत्फ' लुटा!
कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो
"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो? आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ|| अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी गाली हसतांना पडे त्यावर खळी होतसे काय काळजात कुणाला ठावे लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो आता कोठे, मी कोठे तू?

(चौकट)

काव्यरस
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या शाब्दिक चित्राकडे तिथे असतो नवख्या कवीच्या शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा. मला ते चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं थट्टाबध्द मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती. आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच ...

कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे.

लेखनविषय:
कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे. कुणाकडे आहे का? ऑनलाईन कुठे मिळू शकेल?

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

काव्यरस
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
हिरवीनः धनी ऐका माझं बी जरा हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा ||धृ|| हिरो: पाउस पानी काही नाही पेरणीचीबी तयारी नाही हातावर हात ठेवून निसती उभी कशाला कामाचा करते पुकारा?
Subscribe to कविता