Skip to main content

कविता

गंधवार्ता

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ...................................
काव्यरस

मैत्रि (एक खोडकर ओलावा)

लेखक कल्पेश इसई यांनी सोमवार, 11/10/2010 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पेश इसई.(एप्रिल २०००) शाळेच्या काळातली..... शाळेतल्या एकाच बेन्च्वर बसण्यासाठी भान्डण करणारे... तर.. मधल्या सुटिमध्ये आम्बट लोणच्यालाही गोड चव आणणारेही ..तेच हे मित्र सरान्ना मुद्दामुन नाव सान्गणारे ... तर..मार बसु नये म्हणुन त्यान्च्याच समोर खोटे बोलणारेही ....तेच हे मित्र सरान्नी प्रश्न विचारल्यावर घाबरवणारे.. तर्..परिक्षेच्यावेळी येत नसलेले उत्तर सान्ग्ण्यासाठी इशारे करणारेही ....तेच हे मित्र कधिच विश्वास नाहि ठेवावा असे वाटणारे.. पण..
काव्यरस

विभन्ग

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
खवळलेला समुद्र... उत्थुन्ग अशा लाटा.. पण ...पण शान्त का किनारा...!!!!! स्वच्छ स्वच्छ हा प्रकाश ... सुन्दर असा चन्द्र... मग ...मग का हिरमुसल्या चान्द्ण्या...!!!! कळपा कळपात फिरणारे हे बगळे.... पण ...पण का गरुड हा एकटा...!!!! कोसळणारा पाऊस.. चिम्ब भिजलेले मन ... पण ...पण तरिही कोरडेच का आपण...!!!! विचारान्गत झालेले हे मन... गडबड्लेले हे मन.... पण...पण का मुक हे बोलणे...!!!!! ..................................................................कल्पेश इसई (२१ फेब्रुवारी २००५)
काव्यरस

माझी शब्दरचना

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
नाही ...नाही म्हणायचेच होते तुला .. तर हसुनच का बोलली नाहीस.... दुर...दुरच जायचे होते जर तुला ... निरोप का घेउन गेली नाहीस.. तुला साथ नव्हती द्यायची जरी... सवली तरी सोडुन गेली असतीस... मनातुन निघायचेच होते जर तुला.. मनात खोलवर का गेलीस.. अलगदच निघुन गेली असतीस... तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल.. पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन... नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल.. कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... गहिरे हे बोल... घुमसट्लेले हे मन... विचारव्नत हा कवि... पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)
काव्यरस

पुन्हा क्रांती

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 09/10/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थाचा कल्लोळ प्रेमाचा दुष्काळ स्नेहाचा अकाल चोहिकडे हिंसा आणि क्रोध धर्म भेदाभेद बुद्धाला निर्बुद्ध केले आम्ही रोज नवे पक्ष त्यांचे नवे झेंडे प्रत्येकाचे दांडे मजबूत क्रांतीबिंती काही होणारच नाही ऐसे काहीबाही वाटे मज कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे करणारे वेडे सरळ ते होईल होईल मुठी वळतील मेलेला उठेल चितेतूनी चितेच्या या ज्वाला होतील मशाल तख्त हादरेल माजोरडे रयतेचे राज्य रयतेच्या हाती स्वप्नामध्ये क्रांती केली हो मी....!!!
काव्यरस

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली.
काव्यरस

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ|| नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१|| लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब चालून चालून थकून गेले, करू किती मी काम इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२|| सासू माझ
काव्यरस

भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

लेखक शहराजाद यांनी शुक्रवार, 08/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची.

आता काही देणे घेणे उरले नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 07/10/2010 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता काही देणे घेणे उरले नाही १) तृप्ततेची चमक तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी आता काही देणे घेणे उरले नाही.....!! २) मर्यादा सहनशीलतेची तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो माझी सोशिकता संपायला आली..
काव्यरस

तुझं माझं घर...

लेखक जयवी यांनी बुधवार, 06/10/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं घर...एक झोका कधी निळ्याशा ढगांत, कधी पाचूच्या बनात. तुझं माझं घर.... एक फुलबाग कधी प्राजक्ती सडा कधी धुंद केवडा. तुझं माझं घर ... एक चांदणं कधी टिपूर टिपूर कधी गंधाळ आतूर. तुझं माझं घर... एक पाऊस कधी झिम्माड झिम्माड कधी कोसळ द्वाड. तुझं माझं घर.... एक मैफिल कधी तुझिया सुरात कधी माझिया तालात. तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास जयश्री अंबासकर
काव्यरस