Skip to main content

तुझं माझं घर...

लेखक जयवी यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं घर...एक झोका कधी निळ्याशा ढगांत, कधी पाचूच्या बनात. तुझं माझं घर.... एक फुलबाग कधी प्राजक्ती सडा कधी धुंद केवडा. तुझं माझं घर ... एक चांदणं कधी टिपूर टिपूर कधी गंधाळ आतूर. तुझं माझं घर... एक पाऊस कधी झिम्माड झिम्माड कधी कोसळ द्वाड. तुझं माझं घर.... एक मैफिल कधी तुझिया सुरात कधी माझिया तालात. तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2796
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कविता आवडली. दुसर्‍या कडव्याने चौकट मोडलेली आहे. (शेवटले समारोपाचे कडवे सोडले, तर बाकी सर्व कडव्यांत दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळींत आभासी विरोधाचा समन्वय अर्थपूर्ण, सुंदर आहे. दुसर्‍या कडव्यात तसा आभासी विरोध नाही, समन्वय साधल्याचे समाधान नाही.) हे कडवे वेगळेच का म्हणून रचले, ते समजले नाही. त्यामुळे त्याचा वेगळेपणा अजूनपर्यंत आवडलेला नाही.

In reply to by धनंजय

धनंजय, मला म्हणायचं होतं..... कधी प्राजक्तासारखी पखरण.... वर्षाव, तर कधी सुगंधी दरवळ... केवड्यासारखा!!

तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास क्लास!!

मित्रांनो, कविता आवडली ......... खूप खूप धन्यवाद :) मदनबाणा, खरंय तुझं. झोका म्हटलं की हे गाणं हमखास आठवतं :)

नाव वाचून ये तेरा घर ये मेरा घर गाणे आठवले पण त्यातील ओळी हे घर सुंदर आहे पण नेहमीच्या काव्यात्म उपमांना साजेस नसलेले तरी रहाणार्‍यांच्या मनातले आहे असा आशय. वरच्या कवितेत पुन्हा एकदा पाउस, झोका, फुलबाग त्यामुळे पारंपारीक गुडीगुडी काव्यगुणधर्माने जाणारे वाटले. ते गाण पुन्हा एकदा!