Skip to main content

कविता

कोजागिरी पौर्णिमा

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 21/10/2010 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही
काव्यरस

हे काय आहे??

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी बुधवार, 20/10/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दांच्या मागे नसते पुढेही नसते आतही नसते काही कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही? खाज जीवाची शब्द निपजवी अर्थ भोगण्या सच्चा अर्थाचा बापूस टंकतो तो-तो राही कच्चा कसे काय की माहित नाही नकार उरतो सच्चा नकार घेतो हो ही नाही कुशीत अपुल्या बच्चा (प्राचिन कवि ) यशवंतकुलकर्णी
काव्यरस

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 20/10/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....! अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....! पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....! कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....! मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....! सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....! गंगाधर मुटे .........

आई..मिटलेला श्वास - २

लेखक गणेशा यांनी बुधवार, 20/10/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964 पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ----- शब्दमेघ
काव्यरस

प्रतीक्षा

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 19/10/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात सुगंधास्तव तुझ्या झुरते मुग्ध रातराणी एकांतात दूर लवलवते तेल घालूनी ज्योत नयनी गवाक्षात थरथरे पालवी अस्वस्थपणे तरंग उठवुनी डोहात ताटकळते उभी तशीच ओल्या दवात भिजुनी चिंब रात जागली तरी तशीच बसली ती पाखरे अजुनी कोटरात तुझ्या आगमनाची अशी प्रतीक्षा राहिली भरुनी चराचरात जरी होईल निस्तेज तो दिशा उजळता होऊनी प्रभात तरी थांबला बघ तुला पाहण्या चंद्रमा अजुनी अंबरात...
काव्यरस

जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

लेखक गणेशा यांनी रविवार, 17/10/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता ही पाचोळ्या प्रती मेघाची ओढ दाखवते आहे. मेघ- पाउस .मेघ - वसुंधरा ह्यांचे नाते सर्वांना माहीत आहेच. पण या नविन नात्याची अनोखी ओढ प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...
काव्यरस

आई..मिटलेला श्वास - १

लेखक गणेशा यांनी शनिवार, 16/10/2010 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो . नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ
काव्यरस

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी
आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| आजोबा: हलते हे जड डोके, डुगडुगते मान कवळी कुठे चालली, नाही कसले भान आजी: केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी? चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१|| आजोबा: किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले आजी: जु
काव्यरस

गोलात goल

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल गोलात गोल, गोलात गोल गोलात जर गोल गेलात चक्कर येवून मेलात! पुन्हा जन्माल, पुन्हा गोल.... गोलाला गोलून टाकणं काही नाही लवकर जमत जमत नाही म्हणून मग पुन्हा गोलात goलgoल गोलात goल, गोलात goल (स्वगतः चाय ला, कायबी मजा नाय आली गड्या न्हेमीसार्खी!) - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/१०/२०१०
काव्यरस

राप्चिक र्राप्चिक कूल कूल

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 16/10/2010 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालेली टंच बाई जणू दुधात ग्गच्च मलाई माझ्या मनात घालमेल होई राप्चिक रप्चिक कूल कूल... असं कसं माझं वय झालं इतक्या लवकर म्हातारपण आलं सालं नुसतं बघणंच नशिबी आलं राप्चिक राप्चिक कूल कूल.. डोळे विस्फारून पहात होतो भान हरवउन गेलो होतो जणू डोळ्याने आग ओकत होतो राप्चिक राप्चिक कूल कूल.... इतक्यात मुलाच लक्ष गेले माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखले " बाबा उन कडक आहे तो गॉगल लावा" पोर बोलले माझ तोंड शरमेनं खाली गेले काही श्लोक म्हणायचे नाटक केले गीतेचे श्लोक उलटे म्हटले
काव्यरस