Skip to main content

कविता

शोध

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/02/2022 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही

कळते जगत जाताना

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/02/2022 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!

लेखक nemake_va_mojake यांनी रविवार, 30/01/2022 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली. "या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता. आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर. या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं... दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक माझ्याकडे पाहू लागतात यापैकी कुठल्या पोस्टचा मी टारगेट अॉडिअन्स असेन? असेनच का? कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स. जसं की मी चाललोय भर संध्याकाळी उपनगरीय स्टेशनातून बाहेर या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होत
काव्यरस

ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट

लेखक nemake_va_mojake यांनी शनिवार, 29/01/2022 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट* शब्दब्रह्म हा बऱ्यापैकी वापरातला शब्द आहे. या शब्दाला प्राचीन परंपराही आहे. पण अर्थात तो बऱ्याच सैलपणेही वापरला जातो. सध्याच्या काळात माझ्यासारखा बोटांचा चाळा म्हणून काहीही खरडणाराही शब्दब्रह्माचा उपासक आणि भर्तृहरिसारखा साक्षात्कारी सखोल तत्त्वचिंतकही शब्दब्रह्माचा उपासक. फरक असतो तो उपासनेच्या दर्जाचा. भर्तृहरिसारखा थोर चिंतक स्फोट-सिद्धांतातून आदिम नादतत्त्व ते शब्दाचं प्रकट रूप किंवा स्फुट ध्वनिरूप (पश्यंति ते वैखरी) या प्रवासाची उपपत्ती मांडतो. आणि मी माझी फुटकळ, शब्दबंबाळ यमकं जुळवताना जेरीला येतो. पण म्हणून काय झालं? "शब्दब्रह्माचा उपासक"च!

मुर्द्राक्षास...

लेखक nemake_va_mojake यांनी गुरुवार, 27/01/2022 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर *मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा
काव्यरस

मुखपट्टी (मास्क)

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 24/01/2022 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
'मास्क' आता नेहमीच हवा विसरून नाहीच चालणार, बाहेर पडताना ठेवा ध्यानात नाक तोंड झाकून ठेवा जनांत ! तसे तर आपण सवयीने वापरतो अनेकदा मुखवटे, वर वर हसू, ओठाआड राग व्देषाची मनात असते आग !! गोड शब्दाने भुलवतो त्याला ज्याचा मत्सर पेटवतो ज्वाला, वरवर हसत शुभेच्छा देताना, मनात मात्र असूयेची भावना !! 'अरे वा!'असं कौतुक वरवरचं 'लायकी नसताना मिळालय', असं मनातल्या मनात बोलणं. अवघड व्हायचं ना अशावेळी हसणं? मुखपट्टीच्या वापरामुळे आता हे मात्र बरं झालय अंतरातले भाव दिसण्याचं कारणच नाही उरलय !! मनातले खरे भाव आता आरशातल्या स्वतः पुरतेच बाकी कोणाला कसे दिसतील मुखपट्टी मागे दडून राहतील !! -©️सौ.वृंदा म

सारे प्रवासी घडीचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 16/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
या चंद्रमौळीत माझ्या लक्ष सुखे ऱममाण असते कधी सुखाला सांगा कुठे परिमाण जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या तिरीप कोवळ्या उन्हाची भासे जणू ही रेघ सोनसाखळी गळ्याची वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो घुसतो धटिंगण वारा सवे आणतो थेंब पावसाचे उध्वस्त करू पहातो साम्राज्य माझिया सुखाचे कोणी गरीब म्हणूनी हसती मजवर सारे इथे काय आहे म्हणूनी आकलेचे तोडती तारे सारे प्रवासी घडीचे सांगा कोण कुठे काय नेते समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे या चंद्रमौळीत माझ्या ...... १६-१-२०२२
काव्यरस

चांदण्यांच्या सहवासात

लेखक मालविका यांनी बुधवार, 12/01/2022 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते जरा रमावे चांदण्यांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे चांदण्यांच्या सहवासात हात तुझा हातात घ्यावा चांदण्यांच्या सहवासात हलकेच विसावे मिठीत तुझ्या चांदण्यांच्या सहवासात स्पर्शानेच बोलावे चांदण्यांच्या सहवासात श्वासात मिसळावा श्वास चांदण्यांच्या सहवासात तारे सारे निरखावे चांदण्यांच्या सहवासात स्वप्ने असंख्य पहावी चांदण्यांच्या सहवासात गाणे नवे म्हणावे चांदण्यांच्या सहवासात लाटा त्या मोजव्या चांदण्यांच्या सहवासात गोष्टी किती कराव्या चांदण्यांच्या सहवासात सुरताल असा जुळवा चांदण्यांच्या सहवासात मेहफिल अशी सजावी चांदण्यांच्या सहवासात स्मृती जपून ठेवावी चांदण्यांच्या सहवासात

मैत्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/01/2022 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू. मैत्री होती ढगाची उंच उंच डोंगराशी आंगचटीला आला खोड्या करू लागला म्हणून ...... टोचून टोचून डोंगर बोलला भांडण झाल जोरात म्हणून रडू आल ढगाला धार लागली डोळ्याला कट्टी घेऊन डोंगराशी वसुधेच्या कुशीत घुसला आसवांनी पुसलेले अश्रू बघून मनाशीच हसला मीत्राशीवाय करमेना आई जवळ मन रमेना लवकरच येतो म्हणून डोंगराला भेटायला गेला भेट झाली मीत्रांची दोघा पण खुश झाले अधंळी कोशीबिरीचा खेळ पुन्हा खेळू लागले आंधार पडला धरणीवर गार वारा सुटला पुन्हा भांडण होईल म्हणून बळी वाट बघत बसला १६-१२-२०
काव्यरस

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/01/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२