शोध
निर्झरातून वाहणारे
सागरातून लहरणारे
खोल आतून उमलणारे
मी पणाशी झुंजणारे
वास्तवाच्या वाळवंटी
मृगजळे साकारणारे
जाणतो मी स्वल्प काही
जाणिवेला छेदणारे
नेणिवा ओलांडणारे
भोवताला व्यापणारे
व्यापुनी हुलकावणारे
नश्वराच्या चौकटीतून
शाश्वताशी बोलणारे
शोधतो मी गूढ काही
वाचने
3171
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
आली आली आली
In reply to आली आली आली by प्रसाद गोडबोले
फिनिशड माल लवकर येवुद्या
In reply to आली आली आली by प्रसाद गोडबोले
आमचा पर्यत्न :)
In reply to आमचा पर्यत्न :) by गड्डा झब्बू
पघितला
मस्त
खूप छान!