Skip to main content

कविता

तुझ्याचमुळे

लेखक सागरसाथी यांनी शुक्रवार, 18/02/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे.
काव्यरस

शब्दचित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/02/2022 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची

रिमझिमत्या धारातून आलीस.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 17/02/2022 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिमत्या धारातून आलीस होऊनिया चिंब मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब. मातीस स्पर्शती धारा गंधात नाहते धरा तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध. पापण्या मिटून दूर लाजून जाहली चूर थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब. दाटले मनी काहूर डोळ्यात साठला पूर उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?
काव्यरस

आशा

लेखक निनाद यांनी बुधवार, 16/02/2022 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली
काव्यरस

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 15/02/2022 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती , पेपरमध्ये वाचले "आम्हा घरी धन,* *शब्दांचीच रत्ने..." _ जगतगुरू तुकाराम मी सुटलो... बुंगाट आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, जुळवू प्रयत्ने, यमके ही. काय हे जाहले, कोसळला बाजार, कोणता आजार म्हणावा हा? जगाचा पोलीस पाटील, तू ते तर मी हे करेन भेदरला बिचारा युक्रेन युद्ध ज्वर लोक हैराण त्यात, निवडणूक धुरळा, जणू अंगावर झुरळा, झटकती वाहक ही गांजले इथे ट्रॅफिक जाम अमृतांजन बाम, चोपडती शिक्षणाचा खेळ खंडोबा तास ऑनलाईन इयत्तेला सलाईन बोंबलाई यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!
काव्यरस

व्हॅलेंटाईन दिनी

लेखक श्रीगणेशा यांनी सोमवार, 14/02/2022 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/02/2022 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.

(शोध)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 05/02/2022 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही
काव्यरस

शोध

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/02/2022 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही