या चंद्रमौळीत माझ्या
लक्ष सुखे ऱममाण
असते कधी सुखाला
सांगा कुठे परिमाण
जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या
तिरीप कोवळ्या उन्हाची
भासे जणू ही रेघ
सोनसाखळी गळ्याची
वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा
ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा
क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो
उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो
घुसतो धटिंगण वारा
सवे आणतो थेंब पावसाचे
उध्वस्त करू पहातो
साम्राज्य माझिया सुखाचे
कोणी गरीब म्हणूनी
हसती मजवर सारे
इथे काय आहे म्हणूनी
आकलेचे तोडती तारे
सारे प्रवासी घडीचे
सांगा कोण कुठे काय नेते
समाधान हेच असते
परिमाण ते सुखाचे
या चंद्रमौळीत माझ्या ......
१६-१-२०२२
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5931
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
या चंद्रमौळीत माझ्या खुप छान!
खूप छान.
धन्यवाद
सुरेख
माऊली माऊली
In reply to सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
कविता आवडली ...
हम पंछी उन्मुक्त गगन के / शिवमंगल सिंह ‘सुमन
In reply to कविता आवडली ... by मुक्त विहारि
आपण तर
डेबुजी?
In reply to आपण तर by अनन्त्_यात्री
कहा राजा भोज कहा गंगू तेली
In reply to आपण तर by अनन्त्_यात्री
semaphore flag code
ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा
हुरूप आला
In reply to ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा by चौकस२१२
या झोपडीत माझ्या, आमच्या