Skip to main content

कविता

मेरा कुछ सामान... भावानुवाद.

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 10/11/2021 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी ठेवलेले काही जपून अजून. चिंब चिंब भिजलेले श्रावणाचे काही दिन.. एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, रात्रीला त्या विझवून दे ना सारे पाठवून.. ऐकतोस ना रे तूही पाचोळा हा वाळलेला? नाद त्याचा एकदाच कानांमध्ये माळलेला.. शिशिराची एक फांदी हलताहे रे अजून, तीच डहाळी मोडून दे ना सारे पाठवून.. छत्री एकुलती एक, दोघे अधमुरे ओले कोरडे वा चिंब थोडे. सुके तर माझ्यासवे; उशापाशी भिजलेले राहिले का माझे मन? आवरून सावरून दे ना सारे पाठवून.. अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. मेंदीओला दरवळ.. रुसवे ते कितीतरी, आणि अनेक वचनं खरीखोटी भासणारी.. बघ तूही आठवून दे ना सारे पाठवून.. पाठवशी जे तू सारे मृ
काव्यरस

तेजस्विनी दिवाळी

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 08/11/2021 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशमान प्रसन्न सकाळी... लक्ष लक्ष दिव्यांच्या ओळी... आसमंत सारा लख्ख उजळी! घेऊनी सौभाग्य मानवजातीच्या कपाळी... दूर सारूनी संकटाची छाया कभिन्न काळी! हटवूनी निराशेची भेसूर काजळी... मनासी देई आकांक्षेची झळाळी! साजरी करूया... आशेची, समृद्धीची, आरोग्याची... संपन्नतेची, मानवतेची, प्रगतीची... संकटनाशिनी दिवाळी! तेजोमयी दिवाळी!! तेजस्विनी दिवाळी!!! - निमिष सोनार, पुणे

गाथा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/11/2021 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामाच्या गाथेने जेव्हा पछाडले मला तेव्हा ज्ञानोबा नावाचा एक मांत्रिक शोधला भ्रम रिंगण तोडून ज्ञानोबाने केली शर्थ कानामध्ये सांगितला गहनाचा गूढ अर्थ त्याची बहीण मुक्ताई सार्‍या मांत्रिकांची माय सूर्य गिळण्या ही मुंगी नभ उल्लंघून जाय "गाथा बुडवून टाक" मला मुक्ताई दटावे गाथा तरंगून येते अंतर्यामी तिला ठावे गाथा रक्तात भिनते गाथा वज्रलेप होते शब्द रोकडे बोलत पुन्हा पुन्हा पछाडते
काव्यरस

पायातली वहाण..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी बुधवार, 03/11/2021 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
पायातली वहाण... तुला फक्त येते, श्रीखंड अन् पुरी.. आवडत नाही तुला, राईस अँड करी.. आम्ही जातो केळवणाला, तू बस घरी.. कसं आहे, पायातली वहाण, जरा पायातच बरी... येऊ का रे ऑफिसला..? मारते एक फेरी.. क्रेडिट आणि डेबिट मधलं, कळतं का काहीतरी..? घरी बस तुझी तिथेही, कटकट नको भारी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. लाव ना रे आजीला फोन, तिची तब्येत नाही बरी.. इतक्या वेळा शिकवलं तुला, पण विसरतेस तरी.. कधी तुझं तुला जमणार? बावळट आहेस खरी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. दोन पिढ्यांमधील अशीच, वाढत जाते दरी.. हीच परिस्थिती सध्या, तिला दिसते घरोघरी.. समजून घ्यावं ज्याचं त्यानं, गोष्ट आहे खरी..

मी एकटी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/10/2021 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१
काव्यरस

सांजरंग

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 24/10/2021 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
किरणांची पाऊले मिटून हळूच गेली उन्हे परतून पाखरांचा सूर सांजपंखी हुरहुर राहिली उरी रेंगाळून निळ्या नभी ढगांची रांग उभी तांबूस रंग गेला त्यात भरून घरट्यात किलबिल पडे काजळी भूल दिशा साऱ्या गेला हरवून रातराणीचा गंध झाल्या वाटा धुंद पसरले माथ्यावर चांदण्याचे रान
काव्यरस

अवकाळी आला पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/10/2021 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात - पाषाणभेद २४/१०/२०२१
काव्यरस

रानफुले

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 21/10/2021 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
करू कशाला तमा जगाची मागू कशाला उगा क्षमा प्रमाद माझा एकच झाला शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा ढळलो नाही वळलो नाही वेचत गेलो काटे कुटे शोधत होतो जळ मृगजळी अन गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली तमा न केली उगा कशाची फुटलो मी जरी उरी प्रमाद माझा एकच झाला कधी न केले क्रंदन कितीही शीणलो मी तरी जरी लक्ष माझी सोनफुले शोधत होतो रानी वनी कधी न केले अवडंबर त्याचे जरी हाती आली रानफुले....... 21-10-2021
काव्यरस

आभाळाच्या फळ्यावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 20/10/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतूच्या खडूने आभाळाच्या फळ्यावर काहीबाही लिहीण्याची होता ऊर्मी अनावर चांदण्यांच्या ठिणग्यांची घेतो मदत जराशी चित्रलिपी सजविण्या लिहीतो मी जी आकाशी रात्र होते जशी दाट तशा काही अनवट मिथ्यकथा नक्षत्रांच्या उजळती नवी वाट झळाळते तेजोमेघ गूढ कृष्णविवरांशी बोलताना, जोडतो मी नाळ आकाशगंगेशी भेट विराटाशी थेट माझ्या नक्षत्रभाषेची रोमरोमातून तिच्या रुणझुण ये सूक्ष्माची लागे उगवतीपाशी जेव्हा उषेची चाहूल माझ्या नक्षत्रभाषेची फिकटते चंद्रभूल

अश्रूंचे झरे

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 18/10/2021 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न सारे आज पेटले अश्रूंचे झरे डोळ्यांत आटले हृदयात माझ्या गहिरी वेदना जळतो हा प्राण सांगू कुणा पाश अंतरीचे कसे सुटले येते रोज आठवणींचे वादळ थकलेल्या जीवास राहिले ना बळ डोईवरले आभाळ विस्कटून गेले दैव माझे झाले खोटे हातातल्या फुलांचे झाले काटे जुलूम नियतीचे सारे मी झेलले
काव्यरस