Skip to main content

कविता

कविता — मिसळपाववरील मराठी कवितांचा विशाल संग्रह. प्रेम, निसर्ग, समाज, विरह आणि जीवनानुभव यांवरच्या हजारो मराठी कविता, गझल, मुक्तक आणि चारोळ्या येथे वाचा व आपली कविताही प्रकाशित करा.

एक माणूस....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 10/03/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व भ्रष्टाचा-यांच्या गर्दीत
मारेक-यांच्या गारदी त

घराणेशाहीच्या चाटूकारांत
हिंदूविरोधांच्या बाटूकारांत

खोटारड्यांच्या जहरात
फंद फितूरांच्या शहरात

न्यूयाॅर्क टाईम्सच्या पेड लीस्टवर
अतिरेक्यांच्या हिट लीस्ट वर

घरभेदींच्या द्वेषात ही
शिव्याशापांच्या त्वेशात ही

एक माणूस आपल्या कामांमुळे
कसल्या उंचीवर जातो..

550 वर्षांचा रामजन्मभूमी विवाद
सोडवला

70 वर्षांचा काशमीर 370 विवाद
सोडवला

नोटाबंदी चा वादग्रस्त निर्णय
राफेल खरेदीचा अभूतपूर्व निर्णय

काव्यरस

अजि सोनियाचा दिनु

लेखक बाजीगर यांनी रविवार, 06/03/2022 18:51 या दिवशी प्रकाशित केले.

अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
अजि सोनियाचा दिनु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...

बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...

अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु

कृपासिंधु करुणाकरू
कृपासिंधु करुणाकरू
नितिन देवेन मोदीवरु
बाप नितीन गडकरीवरु

मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापारी करार
पारदर्शी व्यवहार व भ्रष्टाचारा न थार

अमर्त्य

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 06/03/2022 08:26 या दिवशी प्रकाशित केले.

mipa

नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले. कदाचित आसे काहीतरी म्हणत असेल काय?

पर्णविहीन,रंगविहीन
सृजनाचे चक्र पहात
अमर्त्य मी एकला
नभ छत्री खाली उभा

काव्यरस

मेघ भरुनी येताना.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 03/03/2022 13:33 या दिवशी प्रकाशित केले.

मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

रिमझिमती असते बरसात
चिंब चिंब भिजलेली रात
कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

मृदगंध भारला वारा
भारी गंधाने गगन धरा
वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

हे तरूवर सर्व स्तब्ध शांत
सभोती उदास हा एकांत
अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

नको पुन्हा एकदा

लेखक सागरसाथी यांनी बुधवार, 02/03/2022 20:40 या दिवशी प्रकाशित केले.

नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा
नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा

नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली
नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा.

हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये
नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा.

डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा
नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा.

देवा तुच धर हात माझा या मावळतीला
झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.

वाऱ्यावर जसे पान

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/03/2022 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

नीज भरते दिशांत
माझे रिते नीजपात्र
उतरूनि ये अंगणी
जरी हळुवार रात्र
रात्र रात्र जागते
गोड स्वप्नातूनि
धुंद गात राहते
अबोल मौनातूनि

येती कानी दुरून
सूर सारंगीचे छान
मन खाई हेलकावे
वाऱ्यावर जसे पान
पान पान जागते
पाचूच्या बनातूनि
शुभ्र सोनसकाळी
झळाळते दवातूनि

- संदीप चांदणे

एकाकी वाट चालताना

लेखक मालविका यांनी सोमवार, 28/02/2022 17:09 या दिवशी प्रकाशित केले.

एकाकी वाट चालताना
भासे तुझाच स्पर्श
आठवण अजुनी येते
जरी सरली कितीक वर्ष

त्या अनवट डोंगरवाटा
चढताना धरीला हात
वचन दिलेस तू मला
देईन कायम साथ

संगतीने तुझ्या घालविले
मी सुखद क्षण निवांत
आताच कसे मग झाले
हे विश्वच सारे शांत

तू आहेस अजुनी माझ्या
चिरकाल स्मृतीतून विहरत
आठवणीत लाविला चाफा
जो आहे अजून बहरत

मराठी भाषा गौरव दिन अभंग

लेखक सागरसाथी यांनी रविवार, 27/02/2022 20:14 या दिवशी प्रकाशित केले.

मीही एक वारकरी
माय मराठी पंढरी,
नतमस्तक होवू तेथे
जेथे कवींची पायरी.

करु रिंगण सोहळा
खेळ शब्दांचा मांडून,
शब्दसृष्टीच्या ईश्वरा
तेथे करुया नमन.

दिव्य सारे अलंकार
सजवू आपल्या देवाला,
नाचवू दिंड्या पताका
गुंफू शब्दांची तुलसीमाला.

आपल्या इवल्या पावलांनी
चालू मोठ्यांची पायवाट,
शब्दसृष्टीचे मायबाप
होवो सदा कृपावंत,

हजारो वर्षांचा सोहळा
रंगतो भाषेचा हा मेळा,
चालो समृद्धीच्या वाटे
लाभो स्वर्गाच्या कळा.

तुझ्या नामाचा ग टिळा
लागावा माझ्या माथी,
बोल माझा चिमखडा
रुजू व्हावा तुझ्या गाथी.

मीर तकी मीरची एक गझल

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 27/02/2022 16:53 या दिवशी प्रकाशित केले.

#मीर_तकी_मीरची_एक_गझल
खूप दिवसापूर्वी एक चित्रपट पहिला होता ‘काली सलवार’ नावाचा . साsदत हसन मंटोच्या ह्याच नावाच्या लघु कथेवर बेतलेला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एका पूर्वी कधीही न ऐकलेल्या गझलचे शेर होते. गायकाचा आवाज आणि शब्द अतिशय वजनदार वाटत होते पण अर्थ अजिबात समजत नव्हता. कवीचे नाव ‘मीर तकी मीर’ चित्रपटाच्या श्रेय नामावली मध्ये सापडले. बरीच शोधाशोध करून शेवटी ही पूर्ण गझल सापडली.

काव्यरस

जगत् त्राही माम्

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 26/02/2022 14:59 या दिवशी प्रकाशित केले.

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटी sssssल

म्हातारा बायडन अन्
कागदी घोडे नाटो
जिसकी लाठी उसकी भैस
जुनी कागदपत्रे फाटो

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील

निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की
नाही पळणार मी झेलीन की
लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी
ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी

धमकी जर नाही आलात शरण
तर हजारोंचे अटळ आहे मरण
इमरान वीटला कर्जबाजारा
समोर जावून घातला मुजरा